उमेदवारांचे पती शासकीय कंत्राटदार असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे अपील होणार?
वरोरा प्रतिनिधी :-
नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सर्वत्र प्रचार आता सुरू झाला आहे. पण, अशातच या निवडणुका लांबणीवर पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा आज मंगळवारी अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे, मात्र वरोरा नगरपरिषद मध्ये एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारीच धोक्यात आल्याची चर्चा असून स्वतः ज्या नगरपरिषद मध्ये शासकीय कंत्राटदार असतांना स्वतःच्या पत्नीला निवडणुकीत उभं केल्याने त्यांचे विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे अपील दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा असल्याने त्या उमेदवाराची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेली आदर्श आचारसंहिता व उमेदवाराची पात्रता निवडणुकीत पाळली जाते, मात्र शासकीय कंत्राटदार यांना त्यांच्यासाह त्यांच्या परिवारातील सदस्यांना निवडणूक लढवता येत नसल्याचे बोलल्या जाते त्यामुळे वरोरा नगरपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तक्रार झाली तर त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे, दरम्यान तो उमेदवार कोण हे मात्र तूर्तास गुलदस्त्यात असून काही तासातच याबाबत माहिती समोर येणार आहे..




