राजकीय दृष्ट्या महत्वाच्या या गावात सलग तीन वेळा तंटामुक्ती अध्यक्ष पद बिनविरोध मिळविणाऱ्या आशुतोष घाटे चे सर्वत्र अभिनंदन..
नंदोरी प्रतिनिधी:-
सामाजिक बांधिलकी जपून गावातील तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारे व गावातील समस्यांचे निवारण करून गावात शांतता सुव्यवस्था राखण्यास समर्थ असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते आशुतोष घाटे यांची नंदोरी (बु) च्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे. गावस्तरावर एखाद्या तरुणावर गावातील तंटे सोडविण्यासाठी सलग तिसऱ्यांदा जबाबदारी गावातील सुज्ञ नागरिकांकडून मिळणे हें निश्चितपणे भूषणावह असून जनतेच्या संपर्कात राहून त्यांची मने जिंकणारे आशुतोष घाटे यांची निवड गावातील सामाजिक आरोग्य व्यवस्थित राखण्यास मोलाची ठरेलं अशी अपेक्षा गावातील जनतेकडून होतं आहे..
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत गावात तंटा होऊ नये यासाठी गाव पातळीवर तंटामुक्ती अध्यक्षाची निवड गावातील सुज्ञ नागरिकांकडून होतं असतें, विशेष म्हणजे तंटामुक्ती अध्यक्षाची पात्रता मुख्यत्वे गावाच्या रहिवाशांच्या सहमतीवर अवलंबून असते आणि त्यासाठी कोणतीही विशिष्ट शैक्षणिक किंवा वयाची अट नाही. अध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये गावातील सदस्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो आणि त्यातून गावातील तंटे मिटवण्यासाठी अध्यक्षाची निवड केली जाते. मात्र ज्या गावात अनेक राजकीय पक्षाचे लोकं कारभारी असतात तिथे सर्वसंमतीने अध्यक्ष निवड करणे ही तारेवरची कसरत असतें पण नंदोरी या गावात सर्वपक्षीय कार्यकर्ते असतांना सर्वांसोबत जुळवून घेण्याचे कसब असणारे आशुतोष घाटे यांनी सलग तिसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या तिसऱ्यांदा निवडीबद्दल नंदोरी (बु ) गावातील तरुणांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.




