Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- दिवाळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर शहरात अंधेवार यांच्यावर होणारा हल्ला पोलिसांनी...

क्राईम ब्लास्ट :- दिवाळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर शहरात अंधेवार यांच्यावर होणारा हल्ला पोलिसांनी उधळला?

सुरज बहुरिया हत्त्याकांड चा बदला घेण्यासाठी आलेल्या बल्लारपूरातील बहुरिया समर्थकांना चंद्रपूर येथील स्थानिक गंज वार्ड परिसरातुन हत्यारासह अटक.

चंद्रपूर:-

बल्लारपूर शहरात सन 2020 ला झालेली सुरज बहुरिया याची हत्त्या आणि त्या हत्तेचा बदला घेण्यासाठी बहुरिया समर्थक गैग कडून आकाश अंधेवार याचेवर 2021 तर अमन अंधेवार याचेवर 2024 ला झालेले गोळीबार ह्या अंत्यत घातक घडामोडी असून आता त्याचं अंधेवार बंधुपैकी एकाला ठार करण्यासाठी चंद्रपूर शहरात मोठा शस्त्रसाठा सुरज बहुरिया समर्थक यांनी गंज वार्ड परिसरात ठेवला होता, मात्र शहर पोलीस स्टेशनं चे डिबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखे चे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या चमुने गुप्त माहितीद्वारे अंधेवार बंधुवर होणारा प्राणघातक हल्ला उधळला असून पोलिसांनी खुनी हल्ल्यासाठी शस्त्र बाळगाणाऱ्या चार आरोपीना अटक केली आहे, त्यात शनिवारी रात्री गंजवॉर्ड येथे केलेल्या या कारवाईत चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरीस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा ऊर्फ टंक्यू, अमित बाडकुराम सोनकर सर्व रा. बल्लारपूर अशी आरोपीची नावे आहेत, या आरोपीकडून पोलिसांनी दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात ८ ऑगस्ट २०२० रोजी दारू व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर येथे सूरज बहुरिया याची दोन जणांनी गोळ्या झाडून भर चौकात हत्या केली होती. या हत्याकांडामध्ये अमन अंदेवर व आकाश अंदेवार या सख्ख्या भावांना त्यावेळी आरोपी म्हणून अटक करण्यात आली, सुरज बहुरिया हत्त्याकांडानंतर आकाश अंधेवार व अमन अंधेवार यांना अटक करून चंद्रपूर च्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते, पण सुरज बहुरिया समर्थक हें या दोन भावांना संपविण्यासाठी प्लॅन आखत होते, दरम्यान आकाश अंधेवार यांची तीन महिन्यानंतर कारागृहातून सुटका करण्यात आली, त्याच्या मार्गांवर सुरज बहुरिया समर्थक होते, मात्र आकाश अंधेवार हें सहज सापडणार नाही म्हणून अंत्यत दिमाग लावून हनी ट्रॅप द्वारे त्यांना रघुवंशी कॉम्प्लेंक्स जवळ बोलावले अन मुलीच्या वैशात बुरखाधारी व्यक्तीने आकाश अंधेवार यांच्यावर गोळीबार केला त्यात तीन गोळ्या आकाशला लागल्या दोन पाठीवर तर एक हाताला लागली होती.

अशी झाली पोलिसांची कारवाई.

२० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार रात्री गस्त घालत असताना, रेकॉर्डवरील आरोपी छोटू सूर्यवंशी (रा. बल्लारपूर) आपल्या साथीदारांसह काळ्या रंगाच्या कारने गंजवार्ड येथील दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेजसमोर देशी कट्टा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांचे पथक रवाना झाले. दरम्यान त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी तात्काळ घेराव घातला. त्यावेळी आठ जणांपैकी चार जण पळून गेले, तर चार जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले. कारची झडती घेतली असता दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार लोखंडी खंजर व अन्य साहित्य असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी शस्त्रासह १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके करीत आहेत. दरम्यान अमन अंधेवार हें महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि कामगार क्षेत्रात त्यांनी कित्तेक कंपन्या व्यवस्थापनासोबत कामगारांच्या हक्कासाठी घेतलेला पुढाकार हा काही राजकारणी नेत्यांना खटकलाअसून त्यांच्या माध्यमातून बहुरिया समर्थक टोळीला तर राजकीय ताकत मिळतं नाही नां? या प्रश्नाचे उत्तर देखील पोलीस तपासात शोधले गेले पाहिजे अशी मागणी होतं आहे.

शहर पोलिसांत गुन्हा दाखल

शहर पोलिसांनी, भा.दं.वि. कलम ३१०(४) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून फरार आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले, ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी राजेंद्र सोनवने, पो.उपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इमरान शेख, सचिन बोरकर, निकेश ढेगे, रुपेश परते, जावेद सिद्दिकी यांच्यासह पोलिसांच्या पथकाने केली.