



जेलपासून रुग्णालयापर्यंतचा मास्टर प्लॅन उघड! ‘छोटू’ टोळीच्या कटामागे कोट्यवधींचा सौदा?
– कोण होता मास्टरमाइंड? कोणाला मिळाले लाखो की करोडो? संपूर्ण उलगडा!
क्राईम ब्लास्ट भाग:-2
दिवाळीआधी चंद्रपूर शहरात घडलेल्या मोठ्या कटाच्या पार्श्वभूमीवर भाग १ मध्ये आपण पाहिले की पोलिसांनी गंजवार्ड परिसरात मोठा शस्त्रसाठा हस्तगत करत, ‘छोटू’ सूर्यवंशी टोळीचा कट उधळून लावला. मात्र, आता भाग २ मध्ये उघडकीस येत आहे एक अत्यंत धक्कादायक आणि योजनाबद्ध षडयंत्र – ज्यामध्ये लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक सौदा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
🔍 जेलपासून रुग्णालयापर्यंत – पूर्ण कटाची मास्टरप्लॅनिंग!
२० ऑक्टोबर रोजी, ज्या दिवशी अटकेत असलेला आकाश उर्फ चिन्ना अंदेवार शासकीय रुग्णालयात दाखल झाला, त्याच दिवशी ‘छोटू’ सूर्यवंशीच्या टोळीतील आठ जण चंद्रपूरमध्ये सक्रिय होते.
हे सर्व फक्त योगायोग असू शकतात का?
पोलिस व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमागे मास्टरप्लॅनिंग असलेल्या एका ‘बड्या मास्टरमाइंड’चा हात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
💰 लाखोंचं नव्हे, ‘कोट्यवधींचं’ आर्थिक कनेक्शन?
पोलिस तपासात असे समोर आले आहे की, अंदेवार बंधूंवर हल्ला घडवून आणण्यासाठी बाहेरील गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क साधण्यात आला होता. या कामासाठी काही स्थानिक लोकांना आणि दलालांना १०–१५ लाखांची रोख रक्कम देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण या कटामागे कार्यरत मास्टरमाइंडला पूर्ण ऑपरेशनसाठी २ ते ३ कोटींपर्यंत रक्कम देण्यात आली असावी, असा संशय आता गडद होत आहे.
🧠 कोण आहे ‘तो’ मास्टरमाइंड?
सध्या पोलिसांनी तपासाचा फोकस या मास्टरमाइंडवर केंद्रित केला आहे, जो कारागृह व्यवस्थापन, पोलीस यंत्रणा आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये नेमक्या जागी पैसा पोहोचवत हल्ल्याची संधी निर्माण करत होता.
सूत्रांच्या माहितीनुसार:
रुग्णालयात भरती होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खोट्या मेडिकल रिपोर्ट वर संशय जेल प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर चौकशी रुग्णालयातील काही कर्मचार्यांच्या हलचाली संशयास्पद
📍 ‘टायमिंग’ इतकं परफेक्ट कसं?
१) अंदेवार यांना त्याच दिवशीच तब्येत बिघडल्याचं दाखवून बाहेर काढलं गेलं 2) ‘छोटू टोळी’चे सदस्य त्याच दिवशी शहरात दाखल 3) शस्त्रसाठा तयार 4) गंजवार्ड आणि रुग्णालय परिसरात रेकी 5) अंदेवार बंधू एकाच वेळी उपस्थित ही सगळी गणितं स्वतःचं ‘योगायोग’ सिद्ध करत नाहीत, तर ‘प्लॅनिंग’चा जोरदार पुरावा आहेत.

🚨 पुढे काय?
पोलिसांनी आंतरराज्यीय टोळी व आर्थिक व्यवहार तपासासाठी प्रवर्तन संचालनालय आर्थिक गुन्हे शाखेची मदत मागवली आहे सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्ड्स, आणि बँक ट्रान्झॅक्शन्स तपासात घेतले गेले आहेत काही राजकीय नेत्यांशी संबंधित नावंही रडारवर आहेत
📢 येणाऱ्या भाग ३ मध्ये वाचा:
कोणत्या जेल अधिकाऱ्यांनी मदत केली? कोणत्या ‘बड्या’ नावाने दिले २ ते ३ कोटी रुपये? रुग्णालयातील ‘इनसाईडर’ कोण? आणि… खरा मास्टरमाइंड समोर येतोय का?





