सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय वारसा असणाऱ्या गांधी चौकाला अखेरची घरघर कुणामुळे? कोण येणार समोर?
वरोरा प्रतिनिधी :-
शहरात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय सभांच्या आयोजनाचं प्रमुख केंद्र असणारा गांधी चौकात विठ्ठल मंदिर च्या बाजारू समितीमुळे आता तिथे मंदिर तोडून व्यवसायिक बांधकाम होतं असल्याने एकच खळबळ उडाली आहे, एरवी देवाधार्माच्या नावावर राजकारणं करणाऱ्या तथाकथित राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे चक्क मंदिर तोडलं असतांना सुद्धा चित्त खवळलं नसेल तर आता ते धार्मिक नपुसंक झाले का? हाही प्रश्न त्या अर्थाने चिंतेचा आणि चितनाचा बनला आहे.
गांधी चौक म्हणजे वरोरा शहराचा आत्मा आहे, इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ऐतेहासिक पुतळा आहे व नगपरिषद द्वारे इथे सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमाचे आयोजन कारण्याकरिता स्टेज करिता ओटा बनविण्यात आला आहे, मात्र नागपरिषद प्रशासनाच्या भ्रष्ट नितीमुळे व लोकप्रतिनिधीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे ऐतेहासिक असणारा गांधी चौक आता बाजार चौक झाला आहे, इथे केवळ वस्तूच विकल्या जात नाही तर येथील ऐतेहासिक वारसा विकल्या जात आहे व धार्मिक स्थळ असणाऱ्या मंदिराची जागा सुद्धा आता विकल्या गेल्याची चर्चा आहे, त्यामुळे सामाजिक धार्मिक असणाऱ्या या स्थळाला कुणी वाचविणार की गांधी चौकाच्या अस्तित्वाची वाट लावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, या संदर्भात लवकरच सनसनीखेज खुलासा आम्ही करणार आहो पण त्याअगोदर कुणी जागणार का? हें पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.




