स्वतः सरपंच पोलीस पाटील या भावांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यानंतर केवळ रवींद्र भोयर यांच्या जागेवर कब्जा करण्याचा ग्रामपंचायतचा डाव?
वरोरा प्रतिनिधी:-
सत्तेचा माज भल्याभभल्यांना भुरळ पाडतो आणि त्यांच्या अंगात तो संचारतो असं आपण ऐकलं असेल पण जेंव्हा आपण स्वतःचं अपराधी असतांना इतरांच्या अपराधवर जेंव्हा आपण कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतोय तेंव्हा मात्र आपल्यावर सुद्धा ताशेरे ओढल्या जाईल असे संकेत असतांना सुद्धा स्वतःचा अपारध दडपून दुसऱ्यांच्या मर्मावर बोट ठेऊन त्यांना दोष देणारे लोकप्रतिनिधी खांबाडा या गावात बघायला मिळाले आहे, विषय ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जागेवर अतिक्रमण करून तिथे जनावरांचे गोठे आणि रहिवासी करिता बांधकाम केल्याचा आहे आणि आता खासदार निधीतून समाजभवन बांधकाम करिता त्या सरकारी जागेवरील अतिक्रमण तोडण्याचा आहे, पण इथे खांबाडा ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश शेळकी आणि त्यांचे बंधू पोलीस पाटील राजू शेळकी यांचे सरकारी जागेवर अतिक्रमण असतांना केवळ रवींद्र भोयर यांच्या जागेवरील अतिक्रमण तोडण्याचा डाव ग्रामपंचायत प्रशासनाने राबविल्याचा धक्कादायक आणि खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान पिडीत रवींद्र भोयर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सरपंच सचिव यांची तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत खांबाडा सरपंच प्रकाश शेळकी, यांच्यासह पोलीस पाटील राजू शेळकी व सदस्य विनाताई गजानन देठे, संतोष उरकुडे, निशा गजानन भोयर असे एकूण 25 लोकांचे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे, त्यात रवींद्र भोयर यांचे सुद्धा अतिक्रमण आहे, मात्र सरपंच पोलीस पाटील यांचे रवींद्र भोयर यांचेशी वाद असल्याने त्याचा बदला घेण्यासाठी केवळ रवींद्र भोयर यांचे अतिक्रमण जागेवरचं खासदार निधीतून मंजूर समाजभवन बांधण्याचा डाव आखला गेला असून मौजा खांबाडा सर्व्हे नंबर 254/1 या जागेची सरकारी मोजणी आज पोलीस बंदोबस्तात होतं आहे. खरं तर या सरकारी जागेवर 25 लोकांचे अतिक्रमण आहे ते एक तर सर्व काढायला हवे किंव्हा सर्वसंमतीने ज्या जागेवर समाजभवन बांधायचे आहे तिथे अतिक्रमण करणाऱ्यांना जागेचा मोबदला द्यायला हवा जेणेकरून संबंधिताना दुसरीकडे आपलं बस्थान ठेवण्याचं काम सोईस्कर होईल पण सुडबुद्धीने केवळ रवींद्र भोयर यांचे अतिक्रमण तोडायचे काम ग्रामपंचायत प्रशासन करतं असल्याने काल जिल्हाधिकारी यांचेकडे सरपंच सचिवाची तक्रार करून आपल्यावर होणार अन्याय दूर करा अन्यथा मी आंदोलन करेन किंव्हा माझे एकट्याचे अतिक्रमण तोडल्यास मी तिथेच आत्महत्त्या करेन असा इशारा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून रवींद्र भोयर यांनी दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार व सुनील भोयर उपस्थित होते..




