Home वरोरा खळबळजनक :- ग्रामस्थांना अंधारात ठेऊन वणी येथील शिनू अन्नाची देशी भट्टी टेमुर्ड्यात?

खळबळजनक :- ग्रामस्थांना अंधारात ठेऊन वणी येथील शिनू अन्नाची देशी भट्टी टेमुर्ड्यात?

 

काही महिन्यापूर्वी अशाच प्रकाराची देशी दारू दुकानं उघडण्याची खांबाडा येथील अंजु अन्ना ची तयारी उधळली असतांना हा प्रयोग कुणामुळे?

वरोरा प्रतिनिधी :

काही महिन्यापूर्वी वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत टेमुर्डा परिसरातील बेकायदेशीर पद्धतीने सुरेश अहिरकर यांचे देशी दारूचे किंवा इतर वाईन शॉपचे दुकान स्थलांतरीत केले जात असल्याचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर स्थानिक युवकांना घेऊन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाचे स्थलांतर करू नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला होत, मात्र आता स्थानिक टेमुर्डा येथील जनतेला काहीही माहिती न देता परस्पर वणी येथील शिनू अन्ना चंद्रपूरातील देशी दारू दुकानं टेमुर्डा येथे स्थलांतरण करण्याची प्रक्रिया करतं असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून यामुळे टेमुर्डा येथे दारू व्यवसायात खळबळ उडाली आहे.

टेमुर्डा गावात जवळपास 30 ते 35 गावाची बाजारापेठ आहे. या ठिकाणी जर देशी दारूच्या दुकानाला मंजुरी मिळाली तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. तसेच कुख्यात दारू तस्कर सक्रिय होऊन ते देशी दारू दुकानाच्या माध्यमातून टेमुर्डा खांबाडा या परिसरातील गावागावात देशी दारू पुरवठा होऊन विद्यार्थी तरुण युवक यांना दारूचे व्यसण लागू शकते, त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्यही बिघडू शकते. दरम्यान या संबंधाने काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सभागृहात टेमुर्डा येथे मतदान झालं होतं देशी दारूचे दुकानं होऊ नये याकरिता 121 तर देशी दारूचे दुकानं सुरू करण्यास 104 महिलांनी मत दिले होते पर्यायाने माजी सरपंचा संगीता आगलावे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारल्या गेला व स्थानिक गावातील पुरुष महिलांनी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या देशी दारू दुकानाच्या स्थानंतरणाला विरोध केला होता व हें प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागात नस्तिबंध करण्यात आले होते, दरम्यान आता पुन्हा तोच प्रकार सुरू असून या प्रकरणात अतिशय गुप्तता पाळली जात असल्याने टेमुर्डा येथील जनतेला अंधारात ठेऊन जी वणी येथील शिनू अन्ना देशी दारू दुकानं टेमुर्डा येथे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ते खळबळ उडवून देणारी बाब आहे.मात्र शिनू अन्ना च्या मागे राजकीय वरदस्त असल्याचे संकेत मिळतं आहे.