वरोरा तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समिती मध्ये आपल्या घरकुल मंजुरी ची यादी बघावी.मनसे करणार मदत..
वरोरा(धनराज बाटबरवे):-
राज्यातील घरकुल लाभार्त्यांना आता 50 हजार अनुदान वाढीव लाभासह सौरऊर्जेचे उपकरण सुद्धा मिळणार आहे, दरम्यान वरोरा भद्रावती तालुक्यात हजारो घरकुल लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे व प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागतं असल्याचे चित्र आहे, कारण गावात वन विभाग किंव्हा नजूल च्या जागेवर घरं बांधण्यासाठी जी मंजुरी लागते त्यात स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व सचिव योग्य सहकार्य करतं नाही आणि अशा जागेवर पट्टे मंजूर करणारी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली असणारी समिती सुद्धा पूर्णतः कार्यरत नाही, पर्यायाने घरकुल योजनेत नाव असून सुद्धा तांत्रिक अडचणमुळे हजारो लाभार्थी वंचीत आहे, त्यामुळे पंचायत समिती स्तरावर एक समिती नेमून घरकुल योजनेला पारदर्शक बनवणे गरजेचे आहे, दरम्यान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकारणे मार्गदर्शन होणार आहे.
काय आहे घरकुल योजना?
घरकुल योजनेत वाढलेल्या अनुदानाचा फायदा आता लाभार्थ्यांना सौरऊर्जेसह मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या घरांचे छत उजळून निघेल. घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या एकूण अनुदानात ५० हजारांची वाढ करण्यात आली असून, त्यातील ३५ हजार रुपये बांधकामासाठी आणि १५ हजार रुपये छतावर १ किलो वॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी देणार आहेत. ही सौरऊर्जा यंत्रणा बसवल्यास घरकुले सौरऊर्जेने उजळणार आहेत.
घरकुल योजना टप्प्याटप्प्यात होणार असून टप्पा क्रमांक दोनमधील पात्र लाभार्थीना ही वाढ मिळणार आहे. १ लाख २० हजार ही अनुदानाची मूळ रक्कम असून, त्यामध्ये ५० हजारांची वाढ झाली आहे. इतर बाबींमधून मजुरी व शौचालय यांची मिळणारी रक्कम व अनुदानातील वाढ यामुळे लाभार्थीना दोन लाखांपर्यंत घरकुल बांधण्यासाठी एकूण अर्थसहाय्य मिळणार आहे.
या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपये मूळचे अनुदान मिळत होते. इतर बाबींमधून २६ हजार रुपये मजुरीसाठी मिळत होते. शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये असे १ लाख ५८ हजार रुपये मिळत होते आता ते 2 लाखापर्यंत करण्यात आले आहे.




