Home वरोरा शोक :- जम्मू च्या पुंच्छ मध्ये शहीद अक्षय निकुरे यांना पिंपळगावच्या भूमीत...

शोक :- जम्मू च्या पुंच्छ मध्ये शहीद अक्षय निकुरे यांना पिंपळगावच्या भूमीत अखेरचा निरोप.

हजारोच्या गर्दीने पिंपळगाव शोकमग्न, स्मशानभूमीची मात्र दुर्दशा स्थानिक प्रशासनाच्या नजरेआड कां? उपस्थितांचा सवाल.

वरोरा ( धनराज बाटबरवे ):-

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेल्या पिंपळगाव येथील निकुरे कुटुंबातील अक्षय हा देशाच्या सैन्यामध्ये काही वर्षांपूर्वीच भरती झाला होता, तो दिनांक 24 डिसेंबरला जम्मूच्या पुंच्छ येथील सैन्य घेऊन जाणाऱ्या एका गाडीत असतांना ती गाडी खाईत कोसळल्याने झालेल्या अपघातात शहिद झाल्याची दुःखद घटना घडली दरम्यान काल पिंपळगावात त्यांचा मृतदेह पोहचला आणि हजारोच्या संख्येने शासकीय इतमनात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, आपल्या मुलाच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आई वडील व आप्तस्वकियांनी हंबर्डे फोडले तर तिथे उपस्थित सर्वांचे डोळे या दुःखद घटनेने पान्हावले होते व अख्खा पिंपळगाव गाव शोकसागरात बुडाला होता. पण शोकांतिका ही आहे की देशाच्या एका शहीदावर अंत्यसंसकर ज्या स्मशानभूमीत केले जात होते त्या स्मशानभूमीची अवस्था एवढी बिकट झाली होती की स्थानिक प्रशासनाला लाज वाटायला हवी. दरम्यान अनेकांनी याबाबत आपला आक्रोश व्यक्त केला.

पिंपळगावत एक अत्यंत सुस्वभावी आणि आई वडिलांना गर्व होईल असं कर्तृत्व असणाऱ्या अक्षयचा असा दुर्दैवी अंत होणार हे कुणालाही माहीत नव्हते मात्र तो देशाच्या सैन्यात देशाचे रक्षण कारण्यासाठी भरती झाला होता त्याचा सार्थ अभिमान गावातील सर्वाना होता मात्र तो शहिद झाल्याने अख्खे गाव हळहळलें, एक सैन्याची बटालियन पिंपळगावत उपस्थित होऊन पिंपळगावच्या या शहीद विराला मानवंदना दिली यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते, दरम्यान स्मशान भूमीची दुर्दशा येथील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन शहीद भूमीत चांगले रस्ते आणि स्मशान भूमिचे बांधकाम करावे अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here