Home वरोरा वरोरा तालुक्यातील रस्त्यावर झालेल्या खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करा.

वरोरा तालुक्यातील रस्त्यावर झालेल्या खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करा.

जिजाऊ क्रांती दल अध्यक्षा योगिता लांडगे यांच्यासह महिलांनी दिले उपविभागीय अभियंता यांना निवेदन.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मागील दोन ते तीन वर्षापासून मांगली ते तुमगावं रोड अतिशय खराब झालेला आहे, दरम्यान खराब रस्त्यामुळे अनेकांचे अपघात होऊन गंभीर जखमी झाले आहे तर काही गर्भवती महिलांना खड्ड्यातून प्रवास करतांना जीवघेण्या त्रास होउन गर्भपातही झाले आहेत, सोबतच नागरिकांना रात्री अपरात्री जाणे येणे करतांना जीवही गमवावा लागतो अशी दाट शक्यता आहे त्यामुळे यावरती चार दिवसात तोडगा काढण्यात अन्यथा जिजाऊ क्रांती दलाच्या माध्यमातून संबंधित मांगली तुमगावं या गावातील महिलांना घेऊन मांगली गावाजवळ चंद्रपूर हायवे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिजाऊ क्रांती दलाच्या अध्यक्षा योगिता लांडगे यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वरोरा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

मांगली तुमगाव या रस्त्याची दुर्दशा स्थानिक लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा त्याकडे डोळेझाक करत आहे, याबाबत लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी दिल्यानंतर सुद्धा कुठलेही रस्त्याची दुरुस्ती होत नाही त्यामुळं प्रशासन आणि ठेकेदार मिळून निकृष्ठ दर्जाचे रस्ते बांधल्या जातं असल्याने याबाबत आपण मांगली तुमगाव या रस्ते दुरुस्तीचे काम आठवडा भरात करावे व तसें आम्हांला कळवावे अन्यथा नागरिकांच्या हितासाठी व महिलांच्या आरोग्याची दखल घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा या निवेदनातून दिला आहे. यावेळी जिजाऊ क्रांती दल अध्यक्षा व वसुधारिणी शेतकरी कंपनी संचालक योगिता लांडगे यांच्यासह आदिवासी टायगर सेना विदर्भ अध्यक्ष मायाताई पेंदोर, क्रांती दल व वसुधारिणी शेतकरी कंपनी संचालक, मनीषाताई लोणगाडगे, वंदना काथवटे ज्योती लांडगे, संगीता मेश्राम, क्षमा नैताम, उषा ठाकरे व इतर महिला उपस्थित होत्या.