शहराचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा असणाऱ्या गांधी चौकात अतिक्रमण करणाऱ्या बाबुलाल अँड कंपनीविरोधात शहरवाशियांचा संताप…
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहराचे सामाजिक सांस्कृतिक व राजकीय अधिष्ठान असलेल्या गांधी चौकात बाबुलाल अँड कंपनी कडून अतिक्रमन करून तिथे पक्के बांधकाम केले असतांना व या संदर्भात वरोरा नगरपरिषद प्रशासनाला तक्रारी दिल्या असतांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेमक्या कुठल्या साखर झोपेत आहे हेच कळायला मार्ग नसून आता तर चक्क त्या अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधकाम होऊन तिथे जे बाबुलाल आईसस्क्रीम चे दुकान थाटले त्याचे उदघाटन खासदार प्रतिभा धानोरकर व नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तर आमदार करण देवतळे यांनी बाबुलाल आईस्क्रीम दुकान थाटल्या बद्दल अभिनंदन केलं आहे असं आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडून सांगण्यात आले होते, दरम्यान शहरातील सामाजिक सांस्कृतिक व राजकीय वारसा चालविणाऱ्या गांधी चौकाचं विद्रुपिकरण होतं असल्याने या क्षेत्रात वावरणाऱ्या जनतेत मोठा संताप व्यक्त होतं आहे.
नगरापरिषद निवडणुकीत राजकीय नेते कार्यकर्ते शहरातील जनतेला आम्ही विकास करू अशी भोळी आशा दाखवून मत मागताहेत, पण शहराचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय वारसा असणाऱ्या गांधी चौकात अवैध बांधकाम होऊन नगरपरिषद ची जागा एका व्यक्तीला मोफत दिल्या जाते, पण कुणीच राजकीय पुढारी समोर येत नाहीं उलट ज्यांचा हातात या शहराच्या विकासाची जबाबदारी आहे ते नगराध्यक्ष आणि खासदार जर अतिक्रमण करून बांधलेल्या दुकानाचं उदघाटन करत असतील व आमदार त्या दुकानंदाराचं वा छान केलंस म्हणून अभिनंदन करत असेल तर मग प्रशासनावर वचक कुणाचा राहिलं हा प्रश्न पडतो, विशेष म्हणजे या अतिक्रमण केलेल्या दुकानाचे उदघाटन करण्यासाठी जी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली त्यात, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांना बोलविण्यात आल्याने या सर्वांची या गांधी चौकातील अतिक्रमन करणाऱ्या बाबुलाल अँड कंपनीला संमती होती का? असा प्रश्न पडतो.
ही कसली प्रशासन व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांचा दुय्यम खेळ?
वरोरा शहरात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि राजकीय सभांच्या आयोजनाचं प्रमुख केंद्र असणाऱ्या गांधी चौकात विठ्ठल मंदिर च्या समितीची जागा असल्याचे सांगण्यात येत आहे, पण रेकॉर्डवर तशी कुठलीही नोंद नगरपरिषद नाहीं, पण तिथे विठ्ठल मंदिराच्या हक्काची जागा केवळ ट्रष्टी कडे होती असं म्हटल्या जातंय मात्र तो चबूतरा (मंदिर) तोडून बाबुलाल अँड कंपनीच व्यवसायिक बांधकाम होतं असताना शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी आक्षेप घेतला, पण नगरपरिषद प्रशासनासोबत गुप्तगु करून आणि विठ्ठल मंदिर देवस्थान च्या कमेटीला हाताशी धरून गोपनीय पद्धतीने त्या जागेवर बांधकाम परवानगी असल्याचे सांगून व माझ्या बांधकामाला विरोध केला तर तुमचे पण बांधकाम तोडायला लावू असा दम देऊन बाबुलाल अँड कंपनीने नगरपरिषद च्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण करून दुकान बांधले, दरम्यान ज्या विठ्ठल मंदिर समितीची जागा असल्याचा बनाव करताहेत त्या जागेवर मंदिर तोडून बांधकाम कारण्याची परवानगी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी कुठल्या नियमांतर्गत दिली हा अतिशय गंभीर विषय आहे,
खरं तर देवधर्माच्या नावावर अनेक कार्यक्रम, उपक्रम व उत्सव करणारे लोकं शहरात कमी नाही, त्यातच गांधी चौकात हे सगळे कार्यक्रम होतं असतात परंतु गांधी चौकातील चक्क मंदिर तोडलं असतांना सुद्धा त्यांचं चित्त खवळलं नाही अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होतं असून गांधी चौकात होणारे अवैध बांधकाम गांधी चौकाचे विद्रूपीकरण करणारी बाब असून यावर आता शहरातील जनतेने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, कारण गांधी चौक हाच एकमेव शहराच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय व्यासपीठ असणारा ठेवा आहे, या मंच्यावर अनेकांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली तो ठेवा जपला गेला नाही तर भविष्यात गांधी चौकात कधी काळी आम्ही सभा घेतल्या किंव्हा त्या चौकातील सभेत मी अमुक अमुक नेत्यांचे धारदार भाषण ऐकले हा केवळ इतिहास बनून राहिलं अशी विदारक परिस्थिती दिसतं आहे, दरम्यान जर खासदार आमदार आणि नगराध्यक्षचं जर अतिक्रमन धारकांना संरक्षण देत असेल तर कायदा फक्त गरिबांसाठीचं आहे का असा प्रश्न निर्माण होतं आहे. आता याबाबत कोण उठाव करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.






