दिनांक 01/10/2025 रोजी प्रकाशीत बातमी बाबत दुय्यम निबंधक यांनी केलेल्या खंडणमुळे भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल संपादकाचा खुलासा..
भद्रावती प्रतिनिधी:-
भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल मध्ये दि. 01/10/2025 रोजी प्रकाशीत बातमी बाबत दुय्यम निबंधक भद्रावती यांनी आपला खुलासा पाठवला असून त्यांनी बातमीचे अवलोकन केले असता त्यात ईतर सामाईक सहधारकांचे समती न घेता एका सहधारकाने त्याचे हिश्याची जमिन विक्रिचे व्यवहार कायदेशीर नाहीत असा समज झाल्याचे दिसुन येते असे म्हटले आहे, मात्र मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 44 अन्वये सामईक मालकीचे जमिनी मधुन एक किंवा अधिक सहधारकाना त्यांचे हिश्याला येणारी मालमत्ता ईतर व्यक्तीस विकण्याची कायदेशीर तरतुद करण्यात आलेली आहे. त्यानुसारच उक्त दस्ताची नोंदणी झालेली आहे असे नमूद करून त्यांनी आपला खुलासा संपादक यांना पाठवला आहे,
दरम्यान जर या कार्यालयातत दस्तांची नोंदणी ही नोदणी अधिनियम व मुद्राक अधिनियम या अनुसरुनच करण्यात येते हें जर सत्त्य असेल तर त्यावर बातमीद्वारे आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही, या बातमी मध्ये जें आरोप संगणक आपॅरेटर राहुल काळे यांचेवर करण्यात आले होते त्याबाबत खुलासा करण्यात आला आहे की हा कत्रांटी कर्मचारी असुन, कार्यालय प्रमुखाने नेमुन दिलेले काम करणे एवढ्याच पुरते त्यांचे कार्यक्षेत्र असते. त्याची कार्यालयीन कामकाजात ढवळढवळ असण्याचे कोणतेही कारण नाही असे नमूद आहे त्यामुळे भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल मध्ये प्रकाशित बातमीचे नियमानुसार जें खंडण दुय्यम निबंधक भद्रावती यांनी केले आहे, त्यावर यापुढे आक्षेप घेण्याचे कारण नाही असे दिसतं आहे, त्यामुळे भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर दिनांक 1/10/2025 रोजी प्रकाशित बातमी बद्दल आलेला खुलासा ग्राह्य पकडून यापुढे संपादक यांची काहीही तक्रार नाही अशी कबुली संपादक मंडळ देत आहे…




