Home वरोरा क्राईम :- वरोरा येथील जिजामाता वार्डातील अवैध दारू विक्रेत्यांची देशी दारू वार्डवशियांनी...

क्राईम :- वरोरा येथील जिजामाता वार्डातील अवैध दारू विक्रेत्यांची देशी दारू वार्डवशियांनी पकडली.

दारू विक्रेत्याकडून वार्डवशियांना  धमकी व शिवीगाळ, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार, आरोपीवर गुन्हा दाखल.

वरोरा प्रतिनिधी :-

कालरात्री दि.७ अक्टोंबर ला नवरात्री चे पावन पर्व सुरु अस्ताना बावणे ले आऊट , जिजामाता वार्ड , एकार्जुना रोड येथे महिला मुली व मुले गरबा खेळत अस्ताना अवैध दारू विकणाऱ्यांची दारू नेत असतांना दिसल्याने स्थानिक नागरीकानी हटकले असतांना अवैध दारू विक्रेते यांनी उपस्थित महिलांना मारहान करण्यासाठी चवताळून अंगावर आले मात्र सामाजिक कार्यकर्त्या रंजना पाराशिवे व मनसे पदाधिकारी प्रतिक मुडे आणि इतर कार्यकर्ते यांनी अवैध दारू विक्रेत्यांना धारेवर धरून अवैध दारू जप्त केली व पोलीस स्टेशनं येथे तक्रार दाखल केली.

वरोरा पोलीस स्टेशनं मध्ये याची दखल घेऊन अवैध दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला यावेळी वार्डातील सगळी महिला पुरुष मंडळी उपस्थित होती दरम्यान शोभा उमरे, सोनाली उमरे, रमेश उमरे, गुलाब भालेराव यांच्या घरामध्ये काही वर्षांपासून अवैध दारू चां धंदा चालू आहे तो धंदा बंद करावा अशी मागणी होतं आहे.