सहाय्यक पोलीस आयुक्त (दक्षता), परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे मनसे पदाधिकारी देणार पुरावे?
आरटीओचा पंचनामा भाग :-20
चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून येथे सर्वसामान्य वाहन धाराकांना लुटण्यासाठी RTO अधिकाऱ्यांनी एक गैग बनवली आहें, त्या गैग चा मुखीया हा प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असतो तर त्यांचे माल गोळा करणारे सहाय्यक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व त्यांचे खाजगी एजंट मिळून वाहन धारकांकडून पैशाची लूट करण्यात येते ही वस्तुस्थिती आहें, दरम्यान राज्यातील सर्व RTO सिमा नाके केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वीच बंद केले असतांना भ्रष्टाचाराची चटक लागलेले RTO अधिकारी या सिमा नाक्यावर अवैध वसुली करत आहें, काही महिन्यापूर्वी चंद्रपूर तेलंगना सिमा नाक्यावर बेकायदेशीर वसुली करताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला एसीबीच्या अमरावती टीम ने 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले होते, या कारवाईत RTO अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांचा सहभाग असतांना सुद्धा त्यांना अटक केली नाही, दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आरटीओ अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या आदेशाने सदर सिमा नाक्यावर वाहन धारकांकडून अवैध वसुली होत असल्याने खरे दोषी हे दोन अधिकारी असतांना केवळ मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यावरच गुन्हे दाखल न करता किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांचेवर पण गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे वाहतूक सेनेकडून करण्यात आली होती.
मनसेच्या आंदोलनाची दखल घेत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी तक्रार नोंदवून घेतली खरी पण आरटीओ अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांचेवर कारवाई करण्यात आली नाही,त्यामुळे मनसे तर्फे परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे सुद्धा तक्रार केली होती त्या अनुषंगाने येत्या 17 मार्च ला मनसे पदाधिकारी यांना पुराव्यासह मुंबई येथील कार्यालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलाविण्यात आले आहे, दरम्यान आरटीओ अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्ट कारनाम्याच्या मालिका “आरटीओ चा पंचनामा ” या सदराखाली मागील अनेक महिन्यापासून सुरु असून या दरम्यान अनेक पुरावे मिळाले आहे, नेमक्या ह्याच पुराव्यावर आता परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (दक्षता) हे दखल घेऊन कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.




