Home चंद्रपूर खळबळजनक :- अजय धवनेनी नोकरीच्या नावाने पैसे घेऊन ते परत न केल्याने...

खळबळजनक :- अजय धवनेनी नोकरीच्या नावाने पैसे घेऊन ते परत न केल्याने बबन बहादे यांची आत्महत्त्या.

रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये अजय धवणे विरोधात गुन्हे दाखल, आणखी प्रकरण उघड होण्याची शक्यता.

चंद्रपूर :-

शहरातील बाबूपेठ परिसरात राहणाऱ्या बबन बहादे यांनी आत्महत्त्या केली असता त्यांनी आपल्या मृत्यू पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये नाट्यक्षेत्रातील कलावंत दिग्दर्शक अजय धवने यांनी नोकरी लावून देतो असे म्हणून घेतलेले पैसे परत न दिल्याने शेवटी कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते, पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त करून बबन बहादे यांच्या आत्महत्तेला जबाबदार अजय धवने व इतर एकावर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान अजय धवने यांनी आतापर्यंत किती लोकांना नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक केली याचा खुलासा होणार आहे. काही वर्षांपूर्वी याचं अजय धवने यांना एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी पैसे परत न केल्याने धु धु धुतले होते, दरम्यान हा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरलं झाला होता, मात्र आता त्यांच्या या फसवणूकीमुळे एकाला आपला जीव गमवावा लागल्याने अजय धवने यांच्या विरोधात मोठा आक्रोश व्यक्त होत आहे.

अजय धवने हे नाट्यक्षेत्राशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे त्यांचे नाव वादात येत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांकडून पैसे घेतल्याचे आरोप धवने यांच्यावर करण्यात येत आहेत. नोकरीचे आश्वासन देऊन पैसे घेतले जातात, मात्र काम न झाल्यानंतर पैसे मागण्यासाठी गेलेल्या लोकांना वारंवार टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये शेवटी चेक देऊन विषय मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र अनेक वेळा ते चेक वटत नसल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे. या संदर्भात काहींनी न्यायालयाचीही दारं ठोठावल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये व्यावसायिक, अधिकारी तसेच सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, यापूर्वीही अजय धवने यांच्याशी संबंधित एक मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. बाबूपेठ येथील आत्महत्येच्या या प्रकरणात सुसाइड नोटमध्ये नाव आल्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमागील नेमकी कारणे काय आहेत, तसेच सुसाइड नोटमध्ये नमूद केलेल्या बाबींची सत्यता काय आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.