Home चंद्रपूर स्तुत्य उपक्रम :-मनसे महिला सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनी गरीब महिलांना साड्या...

स्तुत्य उपक्रम :-मनसे महिला सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनी गरीब महिलांना साड्या वाटप

मनसे महिला सेना चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा बोंबले यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.

चंद्रपूर :-

जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षाताई बोंबले यांच्या नेतृत्वात स्थानिक मनसे रोजगार स्वयंरोजगार सेना जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात गरीब व गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम 8 मार्च ला सायंकाळी 6:00 वाजता आयोजित करण्यात आला, यावेळी भिवापूर प्रभागाच्या नगरसेविका वैशालीताई चंदनखेडे यांचेसह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, पत्रकार विनोद पन्नासे, मंदाताई तऱ्हाळे, प्रगती भोसले व इतर असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,

जागतिक महिला दिनी क्रांतिज्योती सावित्रीवाई फुले जयंती या निमित्याने साजरी करण्यात आली, यावेळी भिवापूर प्रभागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका वैशालीताई चंदनखेडे यांचा सत्कार करण्यात आला, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरीब व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले, दरम्यान जागतिक महिला दिनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना आधार द्यायला हवा, कारण राजमाता जिजाऊनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना घडवलं आणि मराठी मनाचं मावळ मातीचं स्वराज्य या महाराष्ट्रात निर्माण केलं त्या जिजाऊ मातेचे संस्कार आपल्या महिला भगिनीने अवलंबून नवा महाराष्ट्र घडविण्याचं महत्वपूर्ण कार्य करावं असं आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित महिलांना केलं, यावेळी पाहुणे मंडळींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.