Home Breaking News चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक – २०२६ वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये ‘पप्पू...

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक – २०२६ वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये ‘पप्पू भाऊचा पॅनल’ प्रचारांत आघाडीवर —

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक – २०२६ वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये ‘पप्पू भाऊचा पॅनल’ प्रचारांत आघाडीवर —

“एक पंजा आणि तीन कप-बशी” नाऱ्याने प्रचारात आक्रमक मुसंडी”

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक – २०२६ च्या रणधुमाळीत वडगाव प्रभाग क्र. ८ सध्या राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी आला असून येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जनविकास सेना (शेकाप) आघाडीच्या “पप्पू भाऊचा पॅनल” ने प्रचारात आक्रमक आघाडी घेतली आहे. “पप्पू भाऊचा पॅनल — एक पंजा आणि तीन कप-बशी” हा नारा आज संपूर्ण वडगाव प्रभागात घुमत असून, तो केवळ घोषणाबाजी न राहता विकास, काम आणि माणुसकीचा ठाम संदेश देणारा नारा ठरत आहे.

News reporter :-

आघाडीचे अधिकृत उमेदवार

सौ. मनिषा विलास बोबडे — अ-गट ना.मा.प्र. (महिला)

अजय निळकंठराव बल्की — ब-गट ना.मा.प्र.

सौ. प्रतिक्षा अक्षय येरगुडे — क-गट सर्वसाधारण (महिला)

पप्पू देशमुख — ड-गट सर्वसाधारण

“पप्पू देशमुख (पप्पू भाऊ) : नाव नाही, ती एक चळवळ”

वडगाव प्रभागात पप्पू देशमुख म्हणजे केवळ उमेदवार नाहीत, तर सेवा, विश्वास आणि आपुलकीची जिवंत ओळख आहे.
कोणाच्या घरी आजारपण असो, दुःखद निधन असो किंवा आनंदाचा सोहळा—पप्पू भाऊंची उपस्थिती हमखास असते. लग्नसमारंभ असो की अंत्यविधी, मदतीचा हात असो की धीर देणारे शब्द—पप्पू भाऊ प्रत्येक प्रसंगात नागरिकांच्या सोबत उभे राहिलेले दिसतात.
याच सातत्यपूर्ण कार्यामुळे आज वडगावमध्ये एकच चर्चा आहे—“पप्पू भाऊंची हवा”. ही हवा भावनिक नाही, तर कामाच्या जोरावर तयार झालेली लाट आहे.

“अजय निळकंठराव बलकी : युवा वर्गाचा बुलंद आवाज”

वडगाव प्रभागातील युवकांसाठी अजय बल्की हे नाव आज आदर्श आणि आयडॉल ठरत आहे.
सुशिक्षित, अभ्यासू आणि आधुनिक विचारसरणी असलेले अजय बल्की हे युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. कौशल्यविकास, मार्गदर्शन, स्वयंरोजगार, तसेच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
फक्त युवकांपुरतेच नव्हे, तर समाजातील गरजू नागरिकांना वेळोवेळी मदत, सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची त्यांची भूमिका वडगावकरांना भावते आहे.

जनविकासाचा ठोस अजेंडा

“पप्पू भाऊचा पॅनल” केवळ आश्वासनांवर नाही, तर ठोस विकासकामांवर विश्वास ठेवतो.
✔ रस्ते व पायाभूत सुविधा
✔ स्वच्छता व आरोग्य
✔ पाणीपुरवठा व नागरी सुविधा
✔ युवकांसाठी रोजगार व प्रशिक्षण
✔ महिलांसाठी सुरक्षितता व संधी
✔ सामाजिक सलोखा व थेट जनसंपर्क

या मुद्द्यांवर आघाडीने स्पष्ट भूमिका मांडत प्रचार अधिक आक्रमक केला आहे.

वडगावचा सूर स्पष्ट — विजय निश्चित!

आज वडगाव प्रभागात नागरिकांचा सूर स्पष्ट आहे.
“एक पंजा आणि तीन कप-बशी” हा नारा केवळ कानावर नाही, तर मनात बसलेला आहे.
घराघरात, गल्लीबोळात आणि चौकाचौकात एकच चर्चा—
पप्पू देशमुख आणि अजय बल्की यांच्यासह संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करायचे!

नागरिकांना विनंती

समोरील बटन दाबा,
चारही उमेदवारांना विजयी करा,
आणि वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये
विकास, विश्वास आणि जनतेच्या ताकदीचा इतिहास घडवा!