विजयाकडे वाटचाल! | वडगाव प्रभाग क्रमाक ८ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतील सौ. संगीता शेखर वाढई यांच्या पाया मजबूत—
चंद्रपूर | प्रतिनिधी :
चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या रणधुमाळीत वडगाव प्रभागात एक नाव आशेचा, विश्वासाचा आणि विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे — आज वडगाव प्रभागात नागरिकांच्या मनात एकच भावना दाटून आली आहे — “विकासाचा पाया मजबूत झाला की, विजय आपोआप जवळ येतो!”


वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षामुळे त्रस्त असलेले लाईट–नाली–रोडचे प्रश्न, खडबडीत रस्त्यांमुळे होणारी गैरसोय, अंधारात हरवलेली प्रकाशव्यवस्था आणि नागरिकांसाठी खुल्या जागांचा अभाव — या साऱ्या समस्यांवर ठोस, नियोजनबद्ध आणि वेळेत उपाय करण्याचा निर्धार राष्ट्रवादी तील सौ. संगीता वाढई यांनी जाहीर केला आहे. केवळ आश्वासन नव्हे, तर कामातून विश्वास निर्माण करणे हाच त्यांचा मूलमंत्र आहे.

रस्त्यांचे मजबुतीकरण, नाल्यांची शाश्वत व्यवस्था, परिसराचे सौंदर्यीकरण आणि मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी ओपन स्पेस (उद्यान, खेळाचे मैदान, सार्वजनिक जागा) विकसित करण्याचा त्यांचा संकल्प वडगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी ठरणार आहे. महिला, युवक, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक — प्रत्येक घटकाचा आवाज ऐकून समावेशक विकास घडवण्याची भावना त्यांच्या प्रचारात स्पष्ट दिसून येते.
आज वडगाव प्रभागात घराघरांतून एकच संदेश उमटतो आहे — विकासाचा पाया ज्यांच्या हातात सुरक्षित आहे, त्यांच्याच मागे उभे राहायचे! नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि परिवर्तनाची आस पाहता, विजयाकडे वाटचाल ठामपणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना विनंती :
वडगाव प्रभागाच्या विकासासाठी, सुरक्षित भविष्यासाठी आणि मजबूत पायाभरणीसाठी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सौ. संगीता शेखर वाढई यांना प्रचंड मतांनी विजयी करा!



