प्रभागातील समस्याबाबत विविध मोर्चे आंदोलन केल्याने नागरिकांचा देवतळे यांना वाढतोय पाठिंबा
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात असे फार राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जे सदैव जनतेच्या संपर्कात असतात व त्यामुळे ते जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत त्यापैकी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे चंद्रपूर महानगर उपाध्यक्ष जे विठ्ठल मंदिर प्रभागात ड गटातून निवडणूक लढवत आहे त्या राहुल देवतळे यांचा अग्रक्रम लागतो, प्रभागातील रस्ते नाल्यांचा विषय असो की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो राहुल देवतळे हेच त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी समोर असतात एवढेच नव्हे तर स्थानिक सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी अनेकवेळा आंदोलन करून रोजगार मिळवून दिला आहे, दरम्यान मनपा निवडणूकीच्या रणधुमाळीत त्यांचा प्रचारात त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्या पेक्षा आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.
राहुल देवतळे यांची मागील पाच वर्षाची राजकीय सामाजिक कामगिरी नेत्रदीपक असून विठ्ठल मंदिर प्रभागात विविध कार्यक्रम उपक्रम त्यांनी राबविल्याने व त्या माध्यमातून गोरगरीब परिवाराला लाभ मिळाल्यामुळे त्यांना येथील मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे, त्यांच्या सोबत असलेले उमेदवार सुद्धा लढतीत दिसत असून विठ्ठल मंदिर प्रभागात राहुल देवतळे यांची विजयाकडे घोडदौड असल्याचे एकूण चित्र आहे, आता येणाऱ्या 16 तारखेला खरोखरच गोरगरीब जनतेचे सेवक असलेले राहुल देवतळे यांना मतदार निवडून देईल का? हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.




