मोटार वाहन निरीक्षक यांची संख्या वाढल्याने हिस्से वाटणीत कमी पैसे येत असल्याची सबब पुढे करून एंट्री फी मध्ये मोठी वाढ?
RTO चा पंचनामा :-भाग 19
जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीला जोड देणाऱ्या जड वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असतांना त्या वाहनांच्या मालकांना आणि चालकांना RTO चा मात्र दणका नेहमीच बसत असतो, जिल्ह्यात रस्त्यावर वाहन चालवायची असेल तर एंट्री फी द्यावी लागेल अन्यथा गाड्यांचे चालन आणि पेनाल्टी बसून गाडीची जप्तीची कारवाई होणार असा वटहुकूम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सोडल्यानंतर आता त्यांची अधीनस्त RTO सेना त्याची अमलबजावणी करत आहे, अशातच आता राणे नावाच्या RTO अधिकारी यांनी तर्क दिला आहे की अगोदर 9 RTO निरीक्षक होते मात्र आता प्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्याने 15 RTO निरीक्षक झाल्याने एंट्री फी च्या नावाने वसुली होणारी रक्कम ही कमी होतं असल्याने ट्रान्सपोर्टर यांनी एंट्री फी वाढवावी हा तगादा लावल्याने प्रत्येक गाडी मागे 1000/- रुपयाची वाढ होणार आहे त्यामुळे ही एंट्री फी ची दरवाढ़ ट्रान्सपोर्टर ला परवडणारी नसल्याने ट्रान्सपोर्टरांनी RTO वाहन निरीक्षक राणे यांचा प्रस्ताव झूगारून लावला असून त्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे.
चंद्रपूर च्या RTO कार्यालयात किरण मोरे आणि आनंद मेश्राम या जोडगोळीने नवा इतिहास रचून कोट्यावधी रुपयाची माया जमवली असल्याच्या बातम्या होत्या आता त्यांच्या बदल्या झाल्या, मात्र त्यातील किरण मोरे हें चंद्रपूर सोडायला तयार नसून गडचिरीली वरून चंद्रपूर च्या RTO चा पदभार ते सांभाळत आहे, मोठ्या सिताफिने त्यांनी कोर्ट मॅटर करून चंद्रपूर च्या कोट्यावधी च्या वसुली वर डोळा ठेवला असल्याचे बोलल्या जात आहे, मात्र त्यात आता भर पडली असून RTO निरीक्षक योगिता राणे यांनी काही सूत्र आपल्या हाती घेत एंट्री फी मध्ये मोठी दरवाढ़ करून ट्रान्सपोर्टर यांना धक्का दिला आहे, त्यामुळे जवळपास महिन्याकाठी 100 कोटीच्या घरात एंट्री फी, लक्कडदकोट सिमा नाका वसुली व RTO कार्यालयात प्रत्येक गाड्यांच्या ठरलेले दराच्या माध्यमातून होते असलेली माया 120 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे, परंतु ट्रान्सपोर्टर एंट्री फी ची दरवाढ द्यायला तयार नसल्याने RTO ट्रान्सपोर्टर असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
लक्कडकोट सिमा नाका सुरूच?
RTO अधिकाऱ्यांचा दररोज च्या अवैध वसुलीचा अड्डा असणारा लक्कडकोट सिमा नाका बंद करण्याची घोषणा दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, हा सिमा RTO नाका 31 मे ला बंद होणार होता मात्र आताही तो सुरूच आहे, दरम्यान एंट्री फी च्या नावावर ट्रान्सपोर्टर कडून गाड्यांची अवैध वसुली संदर्भात एका पत्रकाराने पोल खोलली असता त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यात RTO निरीक्षक योगिता राणे यांचा पुढाकार होता, त्या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सांतप व्यक्त केला होता, मात्र आता परत राणे यांनी RTO कार्यालयात 9 निरीक्षक होते ते आता 15 झाले आहे असा तर्क देऊन ट्रान्सपोर्टर यांना 2 हजाराचे 3 हजार एंट्री फी मध्ये वाढ करण्याचा तगादा लावल्याने ट्रान्सपोर्टर संतापले आहें,




