Home भद्रावती क्राईम :- आष्टा वाल्मिकी सहकारी संस्थेत अध्यक्ष सचिवांचा लाखोंचा गैरव्यवहार?

क्राईम :- आष्टा वाल्मिकी सहकारी संस्थेत अध्यक्ष सचिवांचा लाखोंचा गैरव्यवहार?

माजी सचिवांचा पत्रकार परिषदेत आरोप, चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी.

भद्रावती /वरोरा प्रतिनिधी                                        ( धनराज मा बाटबरवे)मो.7498923172

भद्रावती तालुक्यातील आष्टा वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थेत पदावर असताना माजी अध्यक्ष आनंदराव मेश्राम व सचिव सुरज भोयर यांनी लाखोंचा गैरव्यवहार केला,असा आरोप संस्थेचे माजी सचिव दिवाकर गोहणे व माजी सात संचालकांनी रविवारी (दि,२ ) पत्रकार परिषदेतून केला आहे. दिवाकर गोहणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आष्टा वाल्मिकी सहकारी संस्थेच्या २०२४-२५ते२०२९-३० या कालावधी साठी १ जून २०२५ रोजी निवडणूक झाली होती.नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र मेश्राम यांनी ९ जून रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी १० जुन रोजी माजी अध्यक्ष आनंदराव मेश्राम व सचिव सुरज भोयर यांनी बॅंकेतून १ लाख २० हजार रुपये नियमबाह्य विथड्रॉल केले, याचा अर्थ माजी अध्यक्ष यांनी एक प्रकारे पैशाची चोरी केली आहे त्यामुळे त्यांच्यासह सचिवावर आर्थिक गैरव्यवहार व फसवणूकीचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान आष्टा वाल्मिकी सहकारी
संस्थेच्या नियमित अंकेक्षणात कोणत्याही आर्थिक गैरव्यवहार आढळलेल्या नाही. मात्र तक्रार आल्यानंतर हे प्रकरण पुनर्परीक्षण लेखा समितीचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चंद्रपूर चे एस. एस. तुपट यांनी दिली आहे.