माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा पत्ता कट होणार? भाजप च्या अंतर्गत गोटात कमालीची रस्सीखेच?
भद्रावती:-
नगरपरिषद चे पडघम वाजू लागल्याने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदचार कोण असणारं याबद्दल चाचपणी सुरू केली आहे, अशातच शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत यावेळी सगळ्यां पक्षाच्या राजकीय टोळ्या भाजप मध्ये सामील झाल्याने व नगराध्यक्ष पदाच्या तब्बल 11 लोकांनी भाजप ची उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या शिफारशी सुरू केल्याने यावेळी तब्बल दोन वेळ नगराध्यक्ष राहिलेले व पुन्हा नगराध्यक्ष पद मिळेल या लालसेने भाजप मध्ये गेलेले अनिल धानोरकर यांना संधी मिळेल यात शंका निर्माण झाली आहे, दरम्यान अनिल धानोरकर यांना धोबीपच्छाड देत भद्रावती पालीकेचे माजी उपाध्यक्ष संतोष आमने हें भाजप कडून नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे भाजप गोटातून सांगण्यात येत आहे. दरम्यान असे घडले तर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा पत्ता कट होणार असल्याची दाट शक्यता आहे.
खरं तर भाजप हा खरोखरचा राजकीय पक्ष सध्या अस्तित्वात नसून इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या टोळ्यांचा हा राजकीय पक्ष आहे, कुणाची ईडी कुणाची सिडी जर लपवयाची असेल तर त्यांना भाजप हा शेवटचा पर्याय असतो व तिथे गेल्यावर सगळे भ्रष्टाचार भाजप च्या वाशिंग मशीन मध्ये धुतले जातात आणि मग त्यांना योग्य ती संधी दिली जाते, दरम्यान भद्रावती नगरपरिषदचे दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले पण आता परिवारवादात स्वतःचे अस्तित्व गमावलेले अनिल धानोरकर यांना कधी काळी कट्टर शत्रू असणाऱ्या भाजप मध्ये पक्ष प्रवेश करावा लागला आणि पुन्हा नगराध्यक्ष पदाचे त्यांना डोहाळे सुरू झाले होते, पण भाजप ची खेळी भल्याभल्यांचे राजकीय अस्तित्व संपवते याचे रमेश राजूरकर हें ज्वलंत उदाहरण असतांना अनिल धानोरकर यांनी भाजप मध्ये केलेला पक्ष प्रवेश त्यांच्या अंगलट आला असल्याचे चिन्ह दिसतं असून भद्रावती पालीकेचे माजी उपाध्यक्ष संतोष आमने हें भाजपचे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे चित्र दिसतं आहे.




