Home भद्रावती धक्कादायक :- आमदार करण देवतळे यांच्या वाहन चालकाची पोलिसांत तक्रार?

धक्कादायक :- आमदार करण देवतळे यांच्या वाहन चालकाची पोलिसांत तक्रार?

चंद्रछाया हॉटेल मध्ये दारू पिऊन धिंगाणा, हॉटेल मालकाला धमकी दिल्याचा नवराष्ट्र निर्माण दैनिकांतून खुलासा?

वरोरा /भद्रावती :-

सत्तेचा माज चढला की भल्याभाल्यांचा उतावीळपणा सार्वजनिक ठिकाणी दिसतं असतो, मी सत्ताधारी पक्षात आहो, मी आमदाराजवळचा आहो, मी खासदार जवळचा आहो असे म्हणत काही दारुडे सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत असतात, असाच दारू पिऊन धिंगाणा घालणारा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांचा वाहन चालक यांचा प्रताप समोर आला, त्याने स्वतःला आमदारांचे स्वीय सहाय्यक आहे म्हणत चक्क हॉटेल मालकाचा टेबल हिसाकावत त्यावर बसून हॉटेल मालकालाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 18 आक्टोबर ला समोर आल्याची बातमी नवराष्ट्र निर्माण दैनिकांतून प्रकाशित करण्यात आली होती,

बातमीतील माहितीनुसार चंद्रपूर मार्गावरील टाकली गावाजवळ निखिल मांडवकर या युवकाने नुकतेच हॉटेल भाड्याने करून स्वतःचा व्यवसाय थाटला होता. या हॉटेलमध्ये दि. १८ ऑक्टोंबर ला रात्री ०८. ३० च्या दरम्यान आम्ही आमदार साहेबांचे कार्यकर्ते आहोत असे म्हणून एक दारुडा जेवण करण्यासाठीं हॉटेल मध्ये बसला, दरम्यान मालकाने त्याला सन्मानजनक बसण्यासाठी खुर्ची दिली, मात्र दारुच्या नशेत असलेल्या त्या आमदाराच्या वाहन चालकाने सगळीकडे आपले सरकार आहे, आम्ही काहीही करू शकतो अशी दमदाटी करून हॉटेल मालकाचा टेबल हिसकावून दादागिरीने त्यावर विश्राम करायला लागला, दरम्यान हॉटेल मालकाने हटकल्याने त्यांनी त्यांच्या साथीदारांना फोन करून बोलावले आणि आमचे सरकार आहे असे म्हणत हॉटेल ची माणसं आमच कोणी काय भिघडवू शकतं नाही अशा आरोळ्या ठोकत हॉटेल मध्ये धिंगाणा घातला. आमदाराच्या वाहन चालकाने एवढ्यावरच न थांबता आम्ही आमदाराचे स्वीय सहाय्यक आहोत आणि केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे, आमचे कोण काय विघडविणार अशी धमकी हॉटेल चालकाला दिली. यावरून सत्ताधारी आमदाराच्या चालकाची दादागिरी समोर आली आहे.

आमदाराच्या वाहन चालकाची पोलिसांत तक्रार?

आमदाराच्या वाहन चालकाने हॉटेल मध्ये घातलेला धिंगाणा आणि हॉटेल व्यावसायिक निखिल मांडवकर यांना दिलेली धमकी वरून त्यांनी पोलिसात ऑनलाइन तक्रात दाखल केली आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आमदाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी वाढली असल्याचे दिसतं आहे, ज्याअर्थी हॉटेल व्यावसायिकांना आमदारांचे कार्यकर्ते धमकावतात तर हें दारुडे कार्यकर्ते जनसामान्य माणसाला किती त्रास देत असेल हे यावरून स्पष्ट होते, मात्र नीतिमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप पक्षाच्या नेत्यांनी आपल्या नितिमत्ता हरविलेल्या कार्यकर्त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा सार्वजनिक ठिकाणी आमदारांच्या अब्रूचे धिंडवडे हें कार्यकर्ते काढतील अशी शक्यता आहे.