निराधार योजनेचा बॅट्याबोळ, प्रशासन व्यवस्था साखर झोपेत असल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर…
कोरपना (प्रतिनिधी )
कोरपना तालुक्यातील विजय बोरर्डे नामक तथाकथित नेत्यांनी प्रशासनाला बनावट दास्तावेज दाखवून स्वतःच्या पत्नी व मुलं-मुलींची नावे निराधार योजनेत समाविष्ट करून शासनाचा निधी बेकायदेशीररीत्या उचलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान निराधार योजनेचा बट्याबोळ झाला असून या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
निराधार योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने अनाथ, अपंग, विधवा व गरजू लोकांना आधार देणे हा आहे. मात्र काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेऊन शासनाची लूट करीत आहेत. अशीच लूट विजय बोर्ड या व्यक्तीने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा (कलम 420) गुन्हा नोंदविण्याची मागणी होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊनही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “गरिबांचा हक्क हिरावणाऱ्या अशा व्यक्तींवर शासनाने तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावे,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रकारामुळे समाजकल्याण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासन निधी परत घेणे व दोषींवर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे.




