भद्रावती पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीना ठोकल्या बेड्या, मन सुन्न करणारी खळबळजनक घटना.
भद्रावती (जावेद शेख ):-
सामाजिक आरोग्य पूर्णतः धोक्यात आलं असून पती पत्नीचा पवित्र संबंधाला आता वासनांध वृत्तीचा दुर्गंधं येत असल्याने अनेक संसार उध्वस्त होतं आहे, अशीच एक खळबळजनक घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे उघडकीस आली असून पत्नीने आपल्या पतिला संपविण्यासाठी दोन इसम व एका महिलेला 1 लाखाची सुपारी देऊन त्यांना संपवलं व काळ हा बदला घेत असतो त्यानुसार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने या घटनेमुळे सामाजिक मन सुन्न झाले आहे. दरम्यान आरोपी विरोधात भद्रावती पोलीस स्टेशनं मध्ये फिर्याद क्रमांक 550/2026 नुसार कलम 103(2), 140 (2), 61( 2) भारतीय न्याय सहिंता नुसार गुन्हे दाखल झाले आहे.
मृतकाचे नाव रविन्द्र तुळशिराम कुळमेथे, वय ४६ वर्ष रा. मुधोली चेक नं. ०२, ता. वामोर्शि, जि. गडचिरीली असून या घटनेमध्ये मुख्य आरोपी ही मृतक रवींद्र कुडमेथे यांची पत्नी दिपमाला रविंद्र कुळमेथे, वय 42 वर्ष, रा. कृषी नगर, वरोरा, तर सह आरोपी वर्षा राजु परचाके, वय 47 वर्ष, रा. लवकुश नगर, मानेवाडा, नागपूर शहर, सोनु उर्फ प्रविण नरेन्द्र कालोकर, वय 31 वर्ष रा. दाहोदा, ता. रामटेक, जि नागपूर व नाझीर नसरूल अंसारी, वय 28 वर्ष, रा. 14 मैल, चिचभवन, अमरावती रोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कळमेश्वर फाटा, नागपूर येथे घडली व मृतकाचे प्रेत मौजा घोडपेठ येथील कर्मवीर शाळा च्या समोर शेत शिवारात असलेल्या हनुमान मंदिर च्या बाजुला फेकण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ०२/०५/२०२६ रोजी १०/३० वा. च्या दरम्यान पो.स्टे. भद्रावती येथे फोन द्वारे माहिती मिळाली कि, घोडपेठ येथे कर्मवीर शाळेजवळच्या रोडवर, हनुमान मंदिर शेजारी एक इसम मृत अवस्थेत पडलेला आहे. सदर माहीती प्रमाणे घटनास्थळी एक पुरुष जातीचा इसम चा मृत देह संशयास्पद स्थितीत मिळुण आला. सदर मृतदेहाची ओळख पटविली असता त्याचे नाव रविन्द्र तुळशिराम कुळमेथे, वय ४६ वर्ष रा. मुधोली चेक नं. ०२, ता. वामोर्शि, जि. गडचिरोली असे समझुन आले. सदर घटने संदर्भात पो. स्टे भद्रावती येथे अकास्मीक मृत्यु ची नोंद घेवून चौकशी केली असता असे निष्पল झाले कि, मृतक ची पत्नी दिपमाला कुळमेथे हिने आरोपी वर्षा परचाखे, सोनु उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना स्वतःचे पतिचा खुन करण्या करिता १,००,०००/-रू ची सुपारी देवून खुन घडवून आणला आहे. करिता पोलीस स्टेशन भद्रावती येथे मर्ग चौकशी वरून गुन्हा क्र ५५०/२६ कलम १०३ (२), १४०(२), ६१(२) भारतीय न्याय संहीता अन्वेय नोंद करण्यात आला असून सर्वं आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




