Home चंद्रपूर सनसनी :- महिला आरक्षणावर खासदार धानोरकरांच्या विधानामुळे खळबळ?

सनसनी :- महिला आरक्षणावर खासदार धानोरकरांच्या विधानामुळे खळबळ?

राजकीय व सामाजिक महिला संघटनाचा तीव्र संताप, भाजप आमदाराने पण केला निषेध.

चंद्रपूर :

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ 2023 च्या विधेयकावर सुधारणा करण्यासाठी विशेष अधिवेशनात संसदेत चर्चा होऊन दुरुस्ती करणारे विधेयक विरोधकांनी हाणून पाडले व देशभरात याबाबत चर्चा सुरू असताना, चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाच्या खासदार Pratibha Dhanorkar यांच्या कथित विधानाने वाद निर्माण झाला आहे. “महिलांना आरक्षणाची गरज नाही” या वक्तव्यामुळे विविध स्तरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

🔹 प्रकरण काय?

संसदेत महिला आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू असताना हे कथित वक्तव्य समोर आले. या विधानामुळे महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका होत आहे.

🔹 महिला संघटनांचा संताप?

जिल्ह्यातील महिला संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
“संघर्ष करून पुढे येणाऱ्या महिलांचा अपमान” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, दरम्यान अनेकांनी हे विधान “असंवेदनशील” आणि “महिलांविरोधी” असल्याचे म्हटले. ज्यांना आपल्या घराणेशाहीमुळे पद मिळाले ते महिलांचा सन्मान काय करणार अशीची चर्चा रंगत आहे.

🔹 काँग्रेस अडचणीत?

काँग्रेसचे नेते Rahul Gandhi यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच पक्षातील खासदारांकडून विरोधी सूर आल्याने पक्षाची भूमिका संभ्रमात आल्याने कांग्रेस महिला आरक्षण मुद्यावर अडचणीत सापडली आहे. यांमुळं पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे.

🔹 पक्षांतर्गत हालचाल.

काही महिला पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याची माहिती असून खासदार धानोरकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

🔹 विरोधकांचा हल्लाबोल.

खासदार धानोरकर यांच्या महिला विरोधी भूमिकेचा विरोधकांकडून जोरदार समाचार घेण्यात आला आहे. “महिला खासदारच महिलांच्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित करत असतील, तर हा विचारसरणीचा पराभव” अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत असून भाजप चे वरोरा विधानसभेचे आमदार करण देवतळे यांनी खासदार धानोरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

🔹 पुढे काय?

या प्रकरणामुळे महिला सक्षमीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत असून काँग्रेस पक्ष यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष. एकूणच: एका विधानामुळे मोठा राजकीय वाद पेटला असून, सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.