Home चंद्रपूर धक्कादायक :- सिडिसिडी बैंक हायकमांडच्या अरेरावी वृत्तीच्या ढक्क्याने बैंक कर्मचाऱ्यांचा आकास्मिक मृत्यू...

धक्कादायक :- सिडिसिडी बैंक हायकमांडच्या अरेरावी वृत्तीच्या ढक्क्याने बैंक कर्मचाऱ्यांचा आकास्मिक मृत्यू ?

पत्नीने फेसबुक पेज वर पोस्ट टाकून व्यक्त केला राग, भ्रष्टाचारी बैंक व्यवस्था पीडित कुटुंबाना न्याय देणार का? सर्वसामान्यांचा सवाल..

चंद्रपूर :-

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अग्रनी बँक म्हणून ओळखल्या जाणारी चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत अनेक घोटाळे आजवर झाले आहे, मात्र बैंकेच्या नोकर भरतीत झालेला घोटाळा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा समोर आला असताना आता या बँकेत चालत असलेली एकाधिकारशाही बैंक कर्मचाऱ्यांच्या आता जीवावर सुद्धा उठली आहे की काय असा प्रश्न पडला असून बँक प्रशासनाच्या अरेरावी वृत्तीने वाय डी पाचरे या बँक कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय रजा घेतली असताना ते आढावा सभेला उपस्थित राहिले नाही म्हमून त्यांना नोटीस पाठविल्याने अगोदरच आजारी असलेल्या कर्मचाऱ्याचा या नोटीस च्या भीतीने आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे घडली आहे.

बैंक कर्मचारी वाय डी पाचरे हे एका आजाराने ग्रासले होते, त्यांचा उपचार सुरु होता, दरम्यान त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती, मात्र वैद्यकीय रजेवर असताना बैंकेच्या आढावा सभेला उपस्थित राहिले नसल्याने बँकेच्या व्यवस्थापक प्रशासन व मानव संसाधन विभागाने अध्यक्ष संचालक/संचालिका यांनी दि.२८.०९.२०२५ रोजी मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा सभेला ते अनुपस्थित राहिले त्यामुळे बँक अध्यक्ष संचालक/संचालिका यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे कारण समोर करून ३ दिवसांचे आंत खुलासा सादर करावा, अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल अशी धमकी वजा इशारा देण्यात आल्याने आजारी असणाऱ्या बँक कर्मचाऱ्याच्या मनावर परिणाम होऊन त्यांचा त्या नोटीस ने आकास्मिक मृत्यू झाला, दरम्यान घरातील कर्ता पुरुष ज्यांनी घराला स्वर्ग बनवलं त्याची छत्रछाया हरपल्याने त्यांच्या पत्नीने आपल्या मनातील खडखद फेसबुक वर व्यक्त केली आणि माझ्या पतीच्या मृत्युंला बैंक अध्यक्ष संचालक व संबंधित बँक अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप केला, दरम्यान पत्नीने फेसबुक पेज वर पोस्ट टाकून जो राग व्यक्त केला त्या भ्रष्टाचारी बैंक व्यवस्था पीडित कुटुंबाना न्याय देणार का? सर्वसामान्यांचा बैंक व्यवस्थापनाला सवाल आहे, आणखी खूप काही त्या पीडित कुटुंबाना सांगायचे आहे असे विशेष सूत्रांकडून समजते.

काय आहे मृत बँक कर्मचारी यांच्या पत्नीची पोस्ट…

बैंक कर्मचारी वाय डी पाचरे यांच्या पत्नी अल्का पचारे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर भावनिक पोस्ट टाकून भ्रष्टाचार करून मस्तावलेल्या अध्यक्ष संचालक व बैंक अधिकारी यांना आठवण करून दिली आहे की “90 दिवसाचं मेडिकल शाखेत देऊन होत तरी या एका कागदामुळे, मी आमच्या साहेबांना कायमच गमवल,,,
4/10/2025 ला आलेले हे पत्रक
6/10/2025 मृत्यू
जेवणाने तुटले होते,,
चालता येत नव्हत,
त्यानेही थकले होते दिवाळीचा बोनस नाही
ते एक वेगळंच टेंशन
त्यात या एका पत्राने भर टाकला
जीवाला मुकले,, घरात होते, दिसत होते, बर वाटत होत पण आता फक्त आठवणी
अशी वेळ कोणावरही येऊ नये
Miss you saheb