Home Breaking News लक्कडकोट आरटीओ सिमा नाक्यावर एसीबीच्या कारवाईत किरण मोरे यांच्यावर गुन्हे दाखल करा.

लक्कडकोट आरटीओ सिमा नाक्यावर एसीबीच्या कारवाईत किरण मोरे यांच्यावर गुन्हे दाखल करा.

लक्कडकोट आरटीओ सिमा नाक्यावर एसीबीच्या कारवाईत किरण मोरे यांच्यावर गुन्हे दाखल करा.

मनसेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी.

चंद्रपूर :-  महाराष्ट्र तेलंगणा सीमा नाका असणाऱ्या लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर दिनांक 23 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) टाकलेल्या धाडीत 500 रुपये लाच घेतांना एका आरटीओ एजंटला अटक केली तर दोन मोटार वाहन निरीक्षक हे अधिकारी फरार झाले, मात्र या सिमा नाक्यावर वसुली करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे हे जबाबदार असल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी केली आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

दिनांक 23 मार्च 2026 रोज सोमवारला नागपूर च्या एसीबी टीम ने महाराष्ट्र तेलंगणा सीमा नाका असणाऱ्या लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर यशस्वी सापळा रचून कारवाई करत ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. या प्रकरणात संबंधित मोटार वाहन निरीक्षकाच्या संगनमताचाही आरोप लावून फरार झालेल्या दोन्ही आरटीओ अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल केला, पण या आरटीओ सीमा नाक्यावर वसुली करण्याचे कंत्राट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनीच दिल्याने व तेच या आरटीओ सीमा नाक्याला चालवितात अशी माहिती असल्याने किरण मोरे यांच्यावरच गुन्हा दाखल करून झाडाझडती घेतली तर दरवर्षी 100 कोटिपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार उघड होऊ शकतो.

एका ४७ वर्षीय ट्रकचालक याने मालवाहू वाहनाला चेकपोस्टवरून सोडण्यासाठी ‘एन्ट्री’च्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी होत असल्याची तक्रार त्याने २० मार्च रोजी नागपूर येथील ACB कार्यालयात दिली होती. या तक्रारीची पडताळणी २३ मार्च रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित एजंटने ५०० रुपयांची लाच मागितल्याचे प्रत्यक्ष एसीबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल, दरम्यान या अगोदर सन 2025 ला अमरावती एसीबी टीम ने असाच सापळा रचून एका खाजगी एजंट सह मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांना 500 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले होते, त्यावेळी सुद्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असताना त्यांनी अमरावती ACB पथकाला पैसे देऊन मैनेज केल्याच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या.

दरम्यान आता किरण मोरे यांची गडचिरोली येथे बदली झाली असताना त्यांनी मुद्दाम स्वतःला चंद्रपूर येथे वरिष्ठाना मैनेज करून कारभार चालविलेला आहे, अर्थात महाराष्ट्र तेलंगणा सीमा नाका असणाऱ्या लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यामार्फत तिथे आरटीओ मोटार वाहन निरीक्षक 24 तास ड्युटीवर ठेवले जात आहे व खाजगी एजंट द्वारे तिथे प्रत्येक वाहन धारकांकडून प्रत्येक्की 500 ते 1000/- रुपयाची लाच घेतल्या जाते.आता या प्रकरणी दोन आरटीओ अधिकारी फरार असून त्यांचा शोध सुरु असतांना मनसे वाहतूक सेना प्रमुख महेश वासलवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन किरण मोरे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आहे, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे सुद्धा उपस्थित होते.