Home भद्रावती खळबळजनक :- भद्रावती शहरातील संताजी नगर गृहनिर्माण संस्थेमध्ये कोट्यावधीचा भूखंड घोटाळा

खळबळजनक :- भद्रावती शहरातील संताजी नगर गृहनिर्माण संस्थेमध्ये कोट्यावधीचा भूखंड घोटाळा

तथाकथित अध्यक्ष यांनी 2007 च्या ठरावाने अवघ्या पंधरा हजारात भूखंड विकल्याची तक्रार. मंडळ अधिकारी समीर वाटेकर व तलाठी यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी..

भद्रावती:-

शहरातील संताजी नगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यांनी जवळपास अडीच कोटीचे भूखंड अवघ्या 15 हजारात स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने विक्री करून कोट्यावधीचा भूखंड घोटाळा केल्याचा खळबजनक प्रकार त्या संस्थेतील सदस्यांनी समोर आणला असून या प्रकरणी त्यांनी संबंधित महसूल अधिकारी व पोलीस प्रशासनाला यांना तक्रार दिली असल्याने संबंधित संस्थेच्या अध्यक्ष व मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

सन १९८० मध्ये नियोजित संताजी नगर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी चिचोर्डी येथील सव्हें क्रमांक १३१/३ ही शेतजमीन खरेदी करून त्यावर सभासदांना प्लॉट वाटप करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर संस्थेच्या मालकीचे प्लॉट क्रमांक ८०, ८१, ८२, ८३, ८७, ८८ आणि ८९ असे एकूण सात भूखंड शिल्लक होते. संस्थेच्या सभासदांनी सन २००७ मध्ये लहानू सखाराम बावणे यांना संस्थेचे सर्वाधिकार दिले होते. मात्र, त्यानंतर काही काळातच बावणे हे भद्रावती शहर सोडून अन्यत्र वास्तव्यास गेले. दरम्यान, फेब्रुवारी २०२४ मध्ये सभासदांनी त्यांचे सर्व अधिकार रितसर रद्द केले होते. दरम्यान अधिकार रद्द झालेले असतानाही, २० जुलै २०२४ रोजी लहानू सखाराम बावणे यांनी स्वतःला अध्यक्ष भासवून इतर सभासदांची संमती न घेता या मौल्यवान भूखंडांची विक्री केली. विशेष म्हणजे, त्या भूखंडाची आजची बाजारकिंमत अडीच कोटी रुपयांच्या घरात आहे.

अडीच कोटींची मालमत्ता 15 हजारात?

अधिकार रद्द झालेले असतानाही, 20 जुलै 2024 रोजी लहानू सखाराम बावणे यांनी स्वतःला अध्यक्ष भासवून इतर सभासदांची संमती न घेता या मौल्यवान भूखंडांची विक्री केली. विशेष म्हणजे, ज्या भूखंडांची आजची बाजार किंमत अडीच कोटी रुपयांच्या घरात आहे, त्या भूखंडांचा व्यवहार कागदोपत्री केवळ 15 हजार रुपयांत दाखवण्यात आल्याने या व्यवहारातील मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय बळावला आहे. जेव्हा खरेदीदार जमिनीच्या मोजमापासाठी प्रत्यक्ष जागेवर पोहोचले, तेव्हा हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

महसूल अधिकारी समीर वाटेकर व तलाठी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

फेरफार करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ आणि त्याखालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यात कलम १५० अंतर्गत नोंदी करणे आणि प्रमाणित करणे, नोंदणीकृत दस्तांची पडताळणी करणे, तसेच तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत, ज्याद्वारे मालकी हक्कातील बदल (उदा. खरेदी-विक्री, वारस) अधिकार अभिलेखात नोंदवले जातात आणि या प्रक्रियेत अचूक कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पाळणे बंधनकारक आहे, मात्र या प्रकरणात प्लॉट विक्री प्रकरणात दुय्यम निबंधक यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संस्थेच्या सदस्यांनी केला असला तरी मंडळ अधिकारी व तलाठी हे तेवढेच दोषी आहेत, असा आरोप संस्थेच्या सदस्यांनी केला आहे, भूखंड विक्रीसाठी संस्थेच्या स्वयंघोषित अध्यक्षाने 2007 च्या ठरावाची प्रत जोडली असून, संस्थेशी संबंध नसलेल्या दोन व्यक्तींकडून लहानू सखाराम बावणे हेच अध्यक्ष असल्याचे स्वयंघोषणापत्र घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फेरफार करताना संस्थेचे सचिव व सभासदांना कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नसल्याचाही पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला आहे. यावेळी बाबा तराळे, मारोतराव सहस्त्रबुद्धे, आनंद वाढई, रामदास खाटीक, युगेश खोब्रागडे, मनोज आष्टनकर, सुरेश मस्के यांसह अनेक सभासद उपस्थित होते.