Home चंद्रपूर सनसनीखेज :- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचं फॉर्म हाऊस कांड पुन्हा चर्चेत?

सनसनीखेज :- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचं फॉर्म हाऊस कांड पुन्हा चर्चेत?

भाजप बंडखोर उमेदवार अजय सरकार आमदार किशोर जोरगेवार यांचे कांड बाहेर काढणार का? का आहे भाजप उमेदवार धर्मसंकटात?

चंद्रपूर :-

भाजप आमदार किशोर जोरागेवर यांनी स्वतःच्या घुग्गुस रोडशेजारी असणाऱ्या फॉर्म हाऊसवर पडलेल्या धाडीत पोलिसांना 50 लाख रुपये देऊन सुटका केल्याचा सणसणीखेज आरोप भाजपाचे बंडखोर अजय सरकार यांनी केल्याने व ते एवढ्यावरच न थांबता जोरगेवार यांचे पुत्र कसे चरित्र्यहीन आहेत याचे पुरावे जनतेसमोर ठेवणार असल्याचा इशारा दिल्याने मनपा निवडणूकीतील भाजप उमेदवार आता पक्षांतर्गत भांडणामुळे धर्मसंकटात सापडले आहे.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीवरून भाजप मध्ये अंतर्गत घामासम सुरु असून पक्षाचे निरीक्षक आमदार संचेती यांच्या समोर भाजप इच्छुक उमेदवार यांनी शक्ती प्रदर्शन केले खरे, पण माजी अर्थमंत्री तथा राज्याचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना वरिष्ठाने डावलल्यामुळे पक्षाची खरी ताकत दुभंगली आणि आयाराम गयाराम असलेल्या आमदार जोरगेवार यांच्या हातात सूत्र आल्याने पक्षाचे कार्यकर्ते बिथरले, ज्यांनी पक्षासाठी स्वतःचं रक्त आटवलं आणि पक्ष संघटन उभं केलं त्या उच्च शिक्षित विधिमंडळ गाजविणारे मुनगंटीवार यांना पक्षाने दिलेलं दुय्यम स्थान भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल अशी स्थिती आहे.

आमदार जोरगेवार येणार अडचणीत?

200 युनिट वीज माफ कारण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे व त्यामुळे हरण्याची भीती असलेले जोरागेवार यांनी 2024 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला व निवडून आले, मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी ज्यांनी त्यांना घडवलं त्या गुरुतुल्य असलेल्या मुनगंटीवार यांच्यासोबत वरिष्ठाचा आशीर्वाद असल्याने फारकत घेतली, दरम्यान आता भाजप चे त्यांना मनपा निवडणुक प्रमुख बनवले, आता आमदार जोरगेवार यांचे कधी काळी अत्यंत जवळीक असलेले माजी नगरसेवक अजय सरकार यांना जाणीवपूर्वक उमेदवारी त्यांनी दिली नसल्याने त्यांनी आमदार जोरगेवार यांचे 10 वर्षांपूर्वीचे फॉर्म हाऊस कांड बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे, अर्थात जर हे कांड समोर आले तर जोरगेवार यांच्या अडचणी वाढणार आहे.

अजय सरकार यांनी आक्रमक पवित्रा घेत आमदारांच्या मुलाच्या खाजगी आयुष्यावरही प्रहार केला. “आमदाराचा मुलगा रात्री बंगाली कॅम्पमधून कोणत्या मुलीला गाडीत बसवून नेतो असा आरोप पण त्यांनी केला आहे, याचे फुटेज आणि माहिती आमच्याकडे आहे. त्यांचे सर्व ‘प्रताप’ (पोतीपुराण) आम्हाला ठाऊक आहेत. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसन्यांवर दगड फेकू नयेत,” असा इशारा त्यांनी दिला

 अजय सरकार यांचं गजब वक्तव्य?

साधारणपणे उमेदवार आपले गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अजय सरकार यांनी, “माझ्यावर २० नाही, ३३ गुन्हे आहेत, असे सांगत एक वेगळाच पायंडा पाडला आहे. “कायद्याने मला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असेही ते म्हणाले. “माझ्यावर गुन्हे आहेत, पण मी पळपुटा नाही. कायद्याच्या चौकटीत बसलो नसतो, तर माझा उमेदवारी अर्ज कधीच बाद झाला असता. निवडणूक आयोगाने मला पात्र ठरवले आहे, मग गुन्हेगार ठरवणारे आमदार कोण? ही निवडणूक आता प्रतिष्ठेची नाही, तर अस्तित्वाची आहे,” असे अजय सरकार यांनी ठणकावून सांगितले.