
अखेर वादावर पूर्णविराम!
वडगाव प्रभाग क्र. ८ मधून भाजप OBC उमेदवारीवर सत्यम संजय गाणार यांचे नाव जाहीर
चंद्रपूर :- वडगाव प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप OBC उमेदवारीवर गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना, संभ्रमाला व वादविवादांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत यादीतून निष्ठावंत व कर्मठ पदाधिकारी सत्यम संजय गाणार यांचे नाव अधिकृतपणे जाहीर झाल्याने प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
गेल्या काही दिवसांपासून वडगाव प्रभागात उमेदवारीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अधिकृत यादीत सत्यम संजय गाणार यांचे नाव प्रसिद्ध असतानाच इतर दोन इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आल्याच्या चर्चांमुळे कार्यकर्ते, नेते तसेच सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. “खरा OBC उमेदवार कोण?” आणि “प्रथम AB फॉर्म कोणाला?” या प्रश्नांवरून प्रभागात राजकीय तापमान चांगलेच वाढले होते.
मात्र, भाजपच्या अंतिम आणि अधिकृत निर्णयानुसार सत्यम संजय गाणार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, पक्षाच्या अधिकृत यादीत त्यांचे नाव प्रकाशित झाल्याने सर्व चर्चांना व अफवांना अखेर फुलस्टॉप लागला आहे. निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आता प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.
वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये भाजपकडून OBC उमेदवार म्हणून सत्यम संजय गाणार यांच्या नावाची घोषणा झाल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागातील लढत अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे.





