म्हाडा च्या राखीव जागेवर प्लाट पाडून विकणारे म्हणतात आम्ही शेती करतो? पण इकडे भलताच प्रकार?
भूमाफिया पंचनामा भाग :- भाग -1
जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात जमिनीचे भाव कडाडले असतांना आता सरकारी जागेसह म्हाडाच्या जागेवर सुद्धा भूमाफियांची नजर जात आहे, दरम्यान पडोली एमआयडीसी परिसरातील एका म्हाडा द्वारे राखीव जागेवर भूमाफिया द्वारे अवैध कब्जा करण्यात आला आहे, दरम्यान या संदर्भात पाहणी केली असता शेती साठी असलेली जागा आणि जवळील इतर जागा मिळून असलेल्या जागेवर लेआउट टाकण्यात आले पण न्यायालयात शेतीची जागा दाखविण्यात आली आणि प्रत्यक्षात म्हाडा च्या रोडवर स्वतःचा रोड तयार करून जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे आणि हे सत्य समोर आल्याने आता या परिसरातील जनतेत मोठा संताप व्यक्त होतं आहे.
पडोली परिसरातील एका जागेवर आज जो लेआऊट टाकून प्लाट विकण्याचा गोरखधंदा सुरु करण्यात आला आहे, तो प्लाट घेणाऱ्या व्यक्तीच्या बोकांडी बसणारा आहे, कारण एका व्यक्तीची दोन एकर शेती असतांना इतर पाच एकर शेती जोडून लेआऊट काढण्याचा जो प्लॅन भूमाफिया बिल्डर लाभीने तयार केलेला आहे, त्याची कुठलीही मंजुरी नसताना केवळ नोटरी करून ते प्लाट चक्क 3 हजार वर्गफूट दराने विकण्याचा घाट घातल्या जात आहे, या संदर्भात मोठे पुरावे भूमिपुत्राची हाक च्या हाती लागले असून येणाऱ्या काळात भुमाफियांचा पंचनामा ही शृंखला चालविण्यात येणार आहे…




