Home Breaking News त्रस्त नागरिकांनीच उरकले रोडचे भूमिपूजन; माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या उपस्थितीत...

त्रस्त नागरिकांनीच उरकले रोडचे भूमिपूजन; माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या उपस्थितीत साईनगर डी.पी. रोडच्या कामाला प्रारंभ

त्रस्त नागरिकांनीच उरकले रोडचे भूमिपूजन; माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या उपस्थितीत साईनगर डी.पी. रोडच्या कामाला प्रारंभ

चंद्रपूर :-  नगर विकास निधीतून मंजूर झालेल्या साईनगर परिसरातून जाणाऱ्या डी.पी. रोडच्या कामाचे भूमिपूजन अखेर आज नागरिकांच्या पुढाकारातून पार पडले. तब्बल ४१ लाख रुपयांच्या निधीचा वर्क ऑर्डर होऊनही अनेक दिवसांपासून भूमिपूजन रखडले होते. स्थानिक नेतेमंडळी उदासीन भूमिका घेत असल्याने संतप्त व त्रस्त नागरिकांनीच पुढे येत हा सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला.

News reporter :- अतुल दिघाडे

आज दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता वीरेंद्र लोढीया व अजय बलकी यांच्या हस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत सदर रस्त्याच्या कामाचे विधीवत भूमिपूजन करण्यात आले. महानगरपालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी काम सुरू व्हावे, या उद्देशाने नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत हा कार्यक्रम उरकला.

भूमिपूजनावेळी जेष्ठ नागरिक श्री. चौधरी, श्री. कोरासे, श्री. मानकर, श्री. भाविक येरगुडे यांच्यासह डाखरे ताई, गिलोकर ताई तसेच परिसरातील महिला शक्तीने टिकास मारून पारंपरिक पद्धतीने पूजन केले. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान व आशेचे भाव दिसून येत होते.

या रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धूळ यामुळे साईनगर परिसरातील नागरिकांचे हाल होत होते. रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे “नेते नाही तर नागरिकच विकास घडवतील” अशी भावना यावेळी स्पष्टपणे दिसून आली.

या भूमिपूजन सोहळ्याला वार्डातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यामध्ये बडू मते, गणेश धवस, चौथाले, कुमाटे, खिरटकर, रुपेश सावे, प्रमोद मन्नते, संजय बोभाटे, सुरेश कुरीकार, देलुजी गायकवाड, देवीदास धवस, खालिद खान, प्रतिक बारसागडे, प्रमोद बारसागडे, संजय बोबडे, भरत चौधरी, छोटू वासाडे, प्रविण मांडवकार, रवी येरगुडे, राजेंद्र येरगुडे, गौरकार, संजय गेडाम, रायपुरे, शुक्ला, खोब्रागडे, बत्कल, अहमद खान, धनंजय डुमरे, प्रशांत रामटेके यांच्यासह अनेक नागरिकांचा समावेश होता.

यावेळी उपस्थितांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. मंजूर निधीतील काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

एकीकडे राजकीय उदासीनता, तर दुसरीकडे विकासासाठी एकवटलेले नागरिक—या चित्रामुळे साईनगर डी.पी. रोडचे भूमिपूजन हे केवळ एक कार्यक्रम न राहता नागरिकांच्या जागरूकतेचे आणि संघर्षाचे प्रतीक ठरले आहे.