चौरंगी लढतीत शिवसेनेचे आजी माजी शिवसैनिक एकमेकांसमोर आव्हान उभे करताहेत, प्रस्थापित पक्षाचे प्रमुख नेते अंडरग्राउंड?
भद्रावती प्रतिनिधी :
भद्रावती नगरपालिकेच्या रिंगणात आता जवळपास चौरंगी लढत असून मित्रपक्ष उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना भाजप हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहे, नगराध्यक्षपदासाठी प्रफुल चटकी (शिवसेना शिंदे), नंदू पढाल (शिवसेना उबाठा), ॲड. सुनील नामोजवार (काँग्रेस) आणि अनिल धानोरकर (भाजप) या चार आजी-माजी शिवसैनिकांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. कधीकाळी हे चारही उमेदवार एकसंघ शिवसेनेत होते. मात्र भाजप कांग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे नेते जणू अंडरग्राउंड झाले की काय असे राजकीय चित्र आहे. त्यामुळे यावेळी धक्कादायक निकाल लागणार अशी राजकीय स्थिती आहे..
१९९७ मध्ये निर्मिती झालेल्या भद्रावती नगरपालिकेत सुरुवातीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व होते. पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे नामोजवार नगराध्यक्ष झाले. तिथून आजवर या नगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकत आला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचेच आजी माजी नगराध्यक्ष व शिवसैनिक लढत आहे, ॲड. नामोजवार, धानोरकर, पढाल आणि चटकी या चौघांमध्येच नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होत आहे.
ॲड. नामोजवार यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष भोगल्यानंतर शिवसेना, भाजप व आता काँग्रेस, असा तीनवेळा पक्ष बदल केला आहे. त्यांचा सलग दोन वेळा नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभव झाला तर एकदा भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असतांना पराभव झाला. यंदाही त्यांनी केवळ नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसमध्ये उडी घेतली.तर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सुद्धा आपल्याच सुनबाई खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात जाऊन भाजप मध्ये प्रवेश घेतला आणि आपण सत्तेसाठी काहीही करू शकतो हे भद्रावती च्या जनतेला दाखवून दिले, भाजप ने फोडाफोडीच राजकारणं करून राजकारणं नासवलं तीच स्थिती भद्रावती मध्ये असून भाजप ने दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना कडेवर घेऊन आपलंच अपत्य म्हणून मिरवलं आहे, कधी काळी ज्या भाजपचे नगरसेवक फोडणारे अनिल धानोरकर आता स्वतःचं भाजप चे अधिकृत उमेदवार झाले आहे, त्यामुळे नितिमत्ता आणि स्वाभिमान त्यांनी गहाण ठेवून राजकारणाचा त्यांनी पचका करून टाकला आहे.




