स्नेहा गर्गेलवार यांची लाकडाची गाडीगाडे च्या माणसाने अडवली, न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान संस्था अध्यक्ष डॉ अशोक वासलावार यांना भोंवणार?
चंद्रपूर :–
चंद्रपूर शहरात सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींनी सुरू केलेले शांती धाम संस्थेद्वारे चालविण्यात येणारे अंत्यसंस्कार केंद्र आता हरीश गाडे नामक व्यक्ती मुळे वादात सापडले आहे, जिथे मृत व्यक्तीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी व त्याला चिरशांती मिळो अशी प्रार्थना करून परिसरातील वातावरण शांत होते त्या पवित्र ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक वासलवार यांनी गाडे नामक व्यक्तीला जेव्हापासून तिथे कर्मचारी म्हणून नियुक्त केले तेंव्हापासून या ठिकाणी अशांती पसरली आहे, तिथे स्नेहा गर्गलवार नामक महिलेवर वाईट नजर ठेऊन तीचा मानसिक छळ करणाऱ्या हरीश गाडे यांनी त्या महिलेचा लाकडाचा टॉल बंद करण्यासाठी आता चक्क लाकडाचे ट्रक अडवले असल्याची संतापजनक माहिती समोर आली असून संस्थे विरोधात स्नेहा गर्गेलवार यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते त्यात तिचे बाजूने निर्णय लागला असतांना आता तीला तिथे हरीश गाडे ज्या पद्धतीने अडथळा करतं आहे तो न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होतं असल्याने संस्था अध्यक्ष डॉ अशोक वासलावार यांना हें प्रकरण भोंवणार अशी शक्यता दिसतं आहे.
नरेंद्र गर्गलवार यांच्या नावाने शांती धाम संस्थेशी करार करून लाकडाचा टॉल सुरू होता. मात्र संस्थेतील कर्मचारी हरीश गोडे याने कारस्थान रचल्यामुळे झालेल्या मानसिक तणावामुळे नरेंद्र गर्गलवार यांचा नोव्हेंबर २०२४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यात खरं तर हरीश गाडे याचेवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता, परंतु डोक्यावरच छत हरवलं आणि जर व्यवसाय पण जर गेला तर करायचं काय ह्या विवंचनेत पोलीस तक्रार गर्गेलवार परिवाराने केली नाही वं तो व्यवसाय स्नेहा हिने स्वतः हाती घेतला.
काय आहे स्नेहा हिचे आरोप?
स्नेहा हिने सांगितले की, “मी व्यवसाय प्रामाणिकपणे चालवते, तरी हरीश गोडे माझ्यावर वाईट नजर ठेवतो, मजुरांना धमकावतो आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला छळतो.” हरीश गोडेवर पूर्वीही विनयभंगाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली. तरीही संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार आणि सचिव घनशामसिंह दरबार यांच्याकडून त्याला पाठबळ मिळत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान गर्गलवार कुटुंबीयांचा करार न्यायालयात प्रलंबित असताना व त्यावर स्थगिती आदेश असूनही संस्थेने लाकडाचे टॉल बंद करण्याचे पत्र दिले व न्यायालयाचा अवमान करून स्नेहाच्या व्यवसायात अडथळे आणले जात आहे, त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कर्मचारी हरीश गाडे आणि इतरांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्नेहा गर्गलवार हिने अगोदरचं केली होती तरीही हरीश गाडे पुन्हा अडथळे का करताहेत? का डॉ अशोक वासलवार यांनी त्यांना मस्ती करण्याची खुली सूट दिली आहे, का डॉ. अशोक वासलवार कायाद्याला मानत नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होतं आहे, दरम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी शांतिधाम संस्थेच्या भ्रष्टाचाराची तक्रार धर्मादाय आयुक्त यांचेकडे दिल्याने या प्रकरणी आता काय निर्णय लागणार हें पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.




