
कर्जाचा बोझा आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने आत्महत्त्या सारखा टोकाचा निर्णय…
वरोरा :-
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने व शासनाची तात्काळ मदत पोहचली नसल्याने शेतकऱ्यांनी जगावं की मरावं या विवचंनेत शेतकरी गळ्याला फास लावतोय किंव्हा कीटकनाशक पिऊन जिवन संपवतोय अशी परिस्थिती सर्वत्र बघावंयास मिळतं असताना वरोरा तालुक्यातील जामगाव बु येथील अल्पभूधारक शेतकरी केशव देवराव आसुटकर वय – 48 वर्ष यांनी विष प्राशन करून काल दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते, मात्र त्यांचा आज पहाटे त्यांचा करून अंत झाला, त्यांच्या मागे पत्नी अर्चना केशव आसुटकर दोन मुलीं तृप्ती केशव आसुटकर व आचल केशव आसुटकर असून बैंकेचे अगोदरचं (एक लाख पाच हजार) 105000/- रुपये कर्ज असताना आता सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाले तर कापसाचे सुद्धा काही खरे नाही, त्यातच सरकारची मदत सुद्धा मिळेल का याबाबत सुद्धा गैरंटी नसल्याने समोर काहीही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी आत्महत्त्या करण्याचा निर्णय करून शेतातच विष घेतले असल्याचे बोलल्या जात आहे.
सरकारचे धोरण हें शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे कर्जमाफीच्या नावावर उदयास आलेले फडणवीस सरकार कर्जमाफीचा मा सुद्धा बोलायला तयार नसून जाहीर केलेली मदत शेतकऱ्यापर्यंत कधी पोहचणार हें अजूनही अनुत्तरीत असून सोयाबीनचे उभे पीक नष्ट झाल्याने मुद्दल सुद्धा निघणार नाही अशी भयंकर स्थिती असून शेतकऱ्यांसमोर पर्याय नसल्याने ते आत्महत्त्या करण्याच्या मानसिकतेत असल्याने सरकारने तात्काळ मदत पोहचवावी अन्यथा केशव आसूटकर सारखे असंख्य शेतकरी आत्महत्त्या सारखा मार्ग स्वीकारतील पण त्यांच्या लेकराबाळाचे काय? हा अत्यंत जिव्हारी लागणारा प्रश्न असून आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण बर्बाद होतं आहे, अर्थात ते कुटुंबच उध्वस्त होतं आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे लागणार आहे, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबतील..



