Home Breaking News धम्मचक्र दिनासाठी चांदा क्लब मैदानाची महानगरपालिकेतील उपायुक्तांकडून पाहणी

धम्मचक्र दिनासाठी चांदा क्लब मैदानाची महानगरपालिकेतील उपायुक्तांकडून पाहणी

 

📰धम्मचक्र दिनासाठी चांदा क्लब मैदानाची महानगरपालिकेतील उपायुक्तांकडून पाहणी

चंद्रपूर :-  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. मंगेश खवले आणि श्री. संदीप चिद्रावार यांनी चांदा क्लब मैदानाची पाहणी केली.

News reporter :- अतुल दिघाडे

या पाहणीदरम्यान मैदानातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, आणि आपत्कालीन सेवा यांची माहिती घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या.

महानगरपालिका प्रशासनाकडून या विशेष दिनासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरु असून, कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत.

#धम्मचक्रअनुप्रवर्तनदिन #ChandrapurPolice #Chandrapur #CMC #CCMC #smartcitychandrapur #PublicSafety #TrafficAler