12 ऑक्टोबर ला होणाऱ्या निवडणुकीत समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना समाज बांधवानी निवडून देण्याची मागणी..
चंद्रपूर:-
सुतार (झाडे) समाज महासंघाच्या येत्या 12 /10/2025 रोज रविवारला हिंगणघाट येथे होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणूकीत सुतार (झाडे) समाज महासंघाचे चंद्रपूर मतदार संघातून 3 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या निवडणुकीत स्नेही मंडळाचे कुशल नेतृत्व करीत समाजात समाज कार्याचा ठसा उमठवणारे कार्यक्षम नेतृत्व व चंद्रपूर कार्यकारिणी चे माजी अध्यक्ष महेश ल. शास्त्रकार, महासंघांचे माजी सदस्य, पडोली कार्यकारिणी चे माजी अध्यक्ष तथा कर्तव्य तत्पर ,उद्योगी, जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर मंडळाचे सदस्य महादेव राव जी वांढरे आणि महिला विभागातून समाकसेवेकरीता सदैव कार्यतत्पर संतोषी अरुण राव भठारकर हे तिघेही आपल्या “कपाट” चिन्हावर निवडणूक लढत आहे,
समाजाला कार्यतत्पर समाजसेवकांची आवश्यकता असतें, कारण जेंव्हा समाजावर अन्याय होतो तेंव्हा सगळा समाज बघ्याची भूमिका घेतो मात्र त्यातले काही लोकं पुढे येतात त्यापैकी महेश शास्त्रकार हें नाव आहे आणि ते समाजासाठी नेहमी धडपडत असतात आणि समाजाच्या विविध कार्यक्रमात आणि उपक्रमात आपले सर्वोच्य योगदान ते देत असतात त्यामुळे त्यांच्या कपाट चिन्हाचे पॅनल समाज बांधव नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल असा सुज्ञ समाज कार्यकर्त्यांना विश्वास आहे, कारण येणाऱ्या 12 ऑक्टोबर ला समाजाची दिशा बदलविणारी ही निवडणूक आहे, त्यात महेश शास्त्रकार सारखा समाजासाठी लढणारा योद्धा व समाजाहितासाठी लढणारा लढवय्या जेष्ठ पुढारी महादेव राव जी वांढरे हें निवडणूकीच्या माध्यमातून समाजापुढे एक पर्याय म्हणून उभे आहे त्यामुळे त्यांच्या पॅनल ला भरघोस मतांनी विजयी कराल करण्याची विनंती त्यांनी केली आहे.




