वारंवार लाईट ची ये-जा आणि कार्यालयातील फोन बंद यामुळे त्रस्त वीज ग्राहकांच्या तक्रारीचे अभियंता आणि लाईनमन का करत नाही समाधान?
वरोरा /भद्रावती
(धनराज बाटबरवे):-
एकीकडे वाढलेले लाईट बिल आणि भर उन्हाळ्यात लाईट जाण्यायेण्याचा लपंडाव हा प्रश्न वीज ग्राहकांचा संताप वाढविणारा ठरत असतांना त्यात भर म्हणजे एमएसईबीचे अभियंते व लाईनमनकडून गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या तक्रारकडे होणारी डोळेझाक आणि त्यांच्यासोबत मुजोरी होतं असल्याने आता या एमएसईबी च्या अभियंता लाईनमनचं करायचं काय? हा गंभीर प्रश्न उपास्थित होतं आहें.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा विभागातील शेगाव खुर्द व परिसरात कृषी पंपाची लाईन बंद राहत असल्याने व गावातील सुद्धा लाईट ये जा होतं असल्याने गावातील सरपंच व प्रतिष्ठित शेतकरी व नागरिकांनी एमएसईबी च्या अभियंता लाईनमनला फोन केला तर ते वेळेवर येत नाही आणि उलट सुलट उत्तर देतात, मात्र वेळेवर बिल भरलं नाही तर बीज कनेक्शन कापतात यामुळे ग्रामीण भागात वीज ग्राहकांचा रोष वाढला आहें, त्यामुळे एमएसईबी च्या अभियंता लाईनमनला वरिष्ठाकडून त्वरित ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी आदेश देण्यात यावे अशी मागणी होतं आहें.
माढेळी येथील कार्यालयाचा फोन बंद?
मागील 1 महिन्या पासुन माढेळी येथील कार्यालयाचा फोन बंद असल्याने जनतेनी रात्री बे रात्री तक्रार कुठे करायची हा मोठा प्रश्न असून अभियंता सायंकाळी 5 वाजेनंतर फोन बंद करून ठेवतात त्यामुळे आमडी नीलजई परिसरात जनतेचा रोष आहें, त्यातच वायरमन गोवलकर यांचा अजब कारभार सुरु असून 7 दिवसा पासुन नीलजई आमडी येथील कृषी पंपाची लाईन बंद करून ठेवली आहे, परंतु एमएसईबी( महावितरण) व्यवस्थेच्या या कारभारामुळे सर्वसामान्य वीज ग्राहक मात्र त्रस्त आहें याची वेळीच दखल घेतली गेली नाही तर जनतेत उद्रेक होऊन एमएसईबी( महावितरण) चे कार्यालय जाळण्याइतपत प्रकरण जाऊ शकते त्यामुळे एमएसईबी( महावितरण) प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहें.




