Home भद्रावती महत्वाची बातमी:- विसलोनच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक दोन दिवस बंद

महत्वाची बातमी:- विसलोनच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक दोन दिवस बंद

 

रहदारी करणाऱ्या प्रवाशांनी गैरसोय होऊ नये म्हणून समजून घ्यावे रेल्वे विभागाचे आवाहन.

माजरी प्रतिनिधी (रवि भोगे)

माजरी–नागपुर ते चंद्रपूर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी दि. १७ दुपारपासून शनिवारी सकाळपर्यंत एमरजेंसी कामामुळे वरोरा – भांदक या रेल्वे मार्गावर विसलोन गेट क्र.३१ वरुन वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारी चार ते शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत विसलोनच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

प्रवाशांची गैरसोय रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळी अकरानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे अशी सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाश्यांनी यावेळेत या मार्गावरुन प्रवास करू नये असे आवाहन माजरीचे ठाणेदार विनित घागे यांनी केली आहे.