Home भद्रावती माजरी-भद्रावती रत्याच्या रेल्वे गेटवरुन बुधवार पर्यंत पुन्हा वाहतूक बंद.

माजरी-भद्रावती रत्याच्या रेल्वे गेटवरुन बुधवार पर्यंत पुन्हा वाहतूक बंद.

 

रेल्वे विभागाने दिल्या सूचना कुणीही या मार्गाने जावू नये.गेटवर लावला नोटीस.

माजरी प्रतिनिधी (रवी भोगे):-

मागील एक दिवसापूर्वी म्हणजे सोमवारला माजरी–नागपुर ते चंद्रपूर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मांजरी भद्रावती रस्त्याचे रेल्वे गेट बंद करण्यात आले होते ती दुरुस्ती मंगळवारला सुरू होणार होती परंतु पुन्हा नव्याने रेल्वे विभागाने आता या मार्गाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने हे गेट १४ तारखेच्या दुपारपासून बुधवार सकाळपर्यंत एमरजेंसी कामामुळे माजरी – भांदक या रेल्वे मार्गावर भांदक गेट क्र.३२ वरुन वाहतूक बंद राहणार आहे.

वाहतूकदार व प्रवाशांना गैरसोय होऊ नये याकरिता या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी दुसऱ्या मार्गांनी जाण्याची व्यवस्था करावी व गैरसोय टाळावी अशी सूचना रेल्वे विभागाने नोटीस द्वारे या परिसरातील प्रवाशांना व वाहतुकदाराना केली आहे.