Home भद्रावती भद्रावतीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

भद्रावतीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

 

आरोपी प्रदीप राणे याला केली भद्रावती पोलीसांनी अटक.

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-

 

भद्रावती शहरातील राहणाऱ्या चंडिका वार्ड येथील एका १३ वर्षीय मुलीचा प्रदीप राणे नामक युवकाने विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली असून भद्रावती पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे नाव प्रदीप पत्रु राणे वय २२ वर्षे, रा काटोल तू. असे आहे. अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या अंगणात बसून असताना आरोपी प्रदीप राणे याने मुलीला तुझ्याशी एक काम आहे आणि काही बोलायचे सुद्धा आहे म्हणून तिला घराबाहेर बोलाविले, दरम्यान त्या मुलीचा हात पकडून छेडखानी करत विनयभंग केला. या सर्व प्रकारची माहिती मुलीने आपल्या घरच्या आई वडिलांना दिली. त्यामुळे त्यांनी याबाबत भद्रावती पोलिसात लगेच तक्रार दिली. पोलिसानी आरोपीविरुद्ध पास्को गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.