Home चंद्रपूर भाजप बंडखोर उमेदवार अजय सरकार विरोधात भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप खराय की...

भाजप बंडखोर उमेदवार अजय सरकार विरोधात भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप खराय की खोटा?

 

आमदार जोरगेवार यांनी सुडभावनेने कटकरस्थान रचून महिलेला समोर केल्याचा भाजप बंडाखोर उमेदवार सरकार यांचा आरोप.

चंद्रपूर :-

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप मध्ये तिकिटं वाटप घोटाळा तत्कालीन शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आणि आमदार जोरगेवार यांनी केल्यानंतर मोठया प्रमाणात भाजप बंडाखोर या निवडणुकीत भाजप च्या अधिकृत उमेदवारविरोधात बंड थोपटलं आहे, त्यातच भाजप च्या अधिकृत उमेदवाराची यादीच गायब करून तब्बल 17 उमेदवारांची नावे कापली आणि स्वतःच्या मार्जितले उमेदवार दिल्या प्रकरणी आमदार जोरगेवार यांचे निकटवर्तीय सुभाष कासगोट्टूवार यांची शहर अध्यक्ष पदावरून हाकालपट्टी करण्यात आली, मात्र ज्यांची उमेदवारी कापली ते अजय सरकार यांनी केवळ बंडचं पुकारलं नाही तर बंगाली कैम्प प्रभागात आपले पेनेल बनबून भाजप च्या अधिकृत उमेदवारांपुढे मोठे आव्हान उभे केले, त्यामुळे या प्रभागाची निवडणूक आमदार जोरगेवार यांनी प्रतिष्ठेची केली असल्याने भाजप बंडाखोर उमेदवार अजय सरकार यांना हरविण्यासाठी आमदार जोरगेवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या एका महिलेने अजय सरकार विरोधात खोटी तक्रार दिली असल्याची प्रतिक्रिया अजय सरकार यांनी दिली आहे.

भाजप बंडाखोर उमेदवार अजय सरकार यांच्या उमेदवारीला आमदार जोरगेवार यांनी क्रिमिनल असल्याचा ठपका ठेऊन जोरदार विरोध केला होता आणि शेवटी त्यांची तिकीट कापण्यात ते यशस्वी झाले. मात्र या घटनाक्रमानंतर अजय सरकार आक्रमक झाले व त्यांनी जोरगेवार यांच्यावर थेट हल्ला चढवला. मला क्रिमिनल संबोधण्याआधी तुम्ही दहा वर्षांपूर्वी फॉर्म हाऊसवर कसे पकडले गेले आणि पन्नास लाख रुपये देऊन कसे सुटले, हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट सरकार यांनी केला. तुमचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडल्यावर दहा लाख देऊन त्याला कसे सोडवले, तुमचा मुलगा रात्रीच्या वेळी कोणत्या मुलींना घेऊन जातो, हे सर्व मला माहित आहे. शिवाय माझ्यावर वीस गुन्हे असल्याचे जोरगेवार म्हणाले, पण ते चुकीचे बोलले. माझ्यावर 33 गुन्हे दाखल असून, ते राजकीय स्वरूपाचे आहेत. खरं तर जोरगेवार यांची सेवा करीत होतो, तेव्हा गुन्हेगार नव्हतो. आता तिकीट द्यायची वेळ आली, तर गुन्हेगार झालो काय, असा संतप्त सवालही सरकार यांनी त्यावेळी केला होता.

जोरगेवार यांच्या कार्यालयातून अजय सरकार विरोधात प्रेसनोट?

तथाकथित मारहान प्रकरणी एका भाजप कार्यकर्ती तथा आमदार जोरगेवार यांच्या मार्जितील महिला हिने जो आरोप अजय सरकार विरोधात लावला व त्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर त्या महिलेचे फोटो टाकून अजय सरकार यांची बदनामी केली त्याची प्रेसनोट ही आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून पत्रकारांना आल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे, त्या महिलेचा खरंच विनयभंग झाला का? खरंच त्या महिलेला मारहान झाली का याचा व्हिडीओ सुद्धा सामाजिक माध्यमावर व्हायरलं झाला असून त्यात ती महिला उलट अजय सरकार च्या गाडी समोर अडथळा निर्माण करतांना दिसत आहे, महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यामुळे हा आमदार जोरगेवार यांचा हा प्लॅन असल्याचे दिसत आहे.

महिलेचा फोटो व व्हिडीओ सामाजिक माध्यमावर टाकणे कुठल्या कायाद्यात?

एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाबद्दल विनयभंग सारख्या गुन्ह्या संदर्भात आरोप लावला तर त्या महिलेचे नाव व तीच्या फोटो बाबत गुप्तता पाळली जाते मग अजय सरकार यांच्यावर विनयभंग चा आरोप ज्या महिलेने लावला त्या महिलेचा फोटो आमदार जोरागेवार यांच्या कार्यालयातून आलेल्या प्रेसनोट मध्ये कसा? हा गंभीर प्रश्न असून काही जोरगेवार समर्थक यांनी त्या महिलेचे व्हिडीओ पण सामाजिक माध्यमावर टाकले असल्याने ते कुठल्या कायाद्यात आहे??हे कळायला मार्ग नसून त्या सर्वावर सायबर क्राईम अंतर्गत गुम्हे दाखल होणार का असा प्रश्न सुद्धा या निमित्याने विचारल्या जात आहे.