बोटाला लावली शाई — माझं मत मी विकणार नाही!
माझा अधिकार, माझा हक्क
चंद्रपूर :
लोकशाहीचा खरा उत्सव म्हणजे मतदान. “बोटाला लावली शाई — माझं मत मी विकणार नाही, माझा अधिकार माझा हक्क” या प्रभावी नाऱ्याखाली चंद्रपूरमधील जागृत नागरिकांनी मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
नागरिकांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी आहे. वेळ काढून घराबाहेर पडून मतदान करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. कारण ज्याने मतदान केले नाही, त्याला उमेदवारांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारही राहत नाही, असे मत अनेक जागृत मतदारांनी व्यक्त केले.
आपल्या विकासासाठी, परिसराच्या प्रगतीसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे. “मी मतदान केले, माझ्या बोटाला शाई लागली, मी माझं मत विकणार नाही” हा अभिमान प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर प्रत्येक मत मौल्यवान आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे, स्वच्छ आणि पारदर्शक मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
चंद्रपूरमधील जागृत नागरिकांचा एकच संदेश —
मतदान करा, हक्क बजावा, लोकशाही मजबूत करा!




