
महानगरपालिका 2026 : विश्वासाचं नातं, विकासाचा संकल्प — प्रभाग क्र. ०८ मधून भावी नगरसेवक सौ. राखी संजय कंचर्लावार यांची दमदार वाटचाल
चंद्रपूर :- महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०८ मध्ये विकास, विश्वास आणि सेवाभावाची नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. “विश्वासाचं नातं, सेवेसाठी बांधलेलं… चला एकत्र येऊन बदल घडवूया!” या प्रेरणादायी विचारांसह भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी जनतेच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
लढायचं… जिंकायचं! या ठाम निर्धारासह सदैव एकनिष्ठ राहून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेली आणि सुरू असलेली कामे आज नागरिकांसमोर विश्वासाचा मजबूत पाया ठरत आहेत. वाचनपूर्तीची कटीबद्धता, महिला सशक्तीकरणावर विशेष भर, कर्तव्याशी सदैव इमानदार भूमिका आणि प्रभागाच्या सेवेकरिता तत्पर असलेली त्यांची कार्यशैली नागरिकांच्या मनाला भावणारी ठरत आहे.
विकासाची कामे — बोटांवर मोजता येणार नाहीत इतकी
प्रभागात उभारण्यात आलेले ओपन फेस गार्डन, गार्डनचे सौंदर्यीकरण, लहान मुलांसाठी सुरक्षित व आकर्षक खेळणी, तरुण व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाची सुविधा, योगासाठी शांत व सुसज्ज जागा — या सर्व गोष्टी प्रभागाला नवे रूप देत आहेत. अमृत जलयोजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचा भक्कम पाया, स्वच्छता, हरित प्रभागाचा संकल्प आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर केंद्रित विकासकामे ही सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या कार्यपद्धतीची ओळख बनली आहे.
नागरिकांचा कौल — विश्वास आणि पसंती
वडगाव प्रभाग क्रमांक ०८ मध्ये सौ. राखी संजय कंचर्लावार यांना भावी नगरसेवक म्हणून मिळणारी वाढती पसंती केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष कामांवर आधारित आहे. घराघरात पोहोचणारा संवाद, समस्यांवर तत्काळ तोडगा आणि विकासासाठी अखंड प्रयत्न यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
महिला सशक्तीकरण, युवकांसाठी संधी, ज्येष्ठांसाठी सुविधा आणि संपूर्ण प्रभागाचा समतोल विकास — या ध्येयांसह सौ. राखी संजय कंचर्लावार यांची ही वाटचाल प्रभाग ०८ ला बदलाच्या दिशेने घेऊन जाणारी ठरत आहे.
महानगरपालिका 2026 मध्ये विश्वास, विकास आणि सेवाभाव यांचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव आज प्रभागात ठळकपणे चर्चेत आहे.





