मनसे तर्फे गावकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन ग्रामसभेत मंजुरी मिळावी याकरिता पैशाचे वाटप करणाऱ्यांविरोधात तक्रार देणार?
चंद्रपूर:-
वरोरा तालुक्यातील माढेळी परिसराच्या जळका ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व सचिव यांच्या संगनमताने मौजा वडगाव येथे देशी दारू दुकानाला मंजुरी देण्यासाठी पैसे वाटप केल्या जात असल्याने या देशी दारू दुकानाला स्थानंतरण करिता परवानगी देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या परिसरातील गावकऱ्यांना सोबत घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करणार असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे, यावेळी जळका ग्रामपंचायत च्या माजी सरपंच निता बोढाले व इतर गावकरी उपस्थित होते.
वरोरा तालुक्यात जळका गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा वडगाव सर्व्हे क्रमांक 41 मध्ये देशी दारूचे दुकान दिपक शंकर जयस्वाल, सुरेश बाबुराव गुप्ता व महादेव लक्ष्मण आसूटकर यांच्या व्यवसायिक भागीदारीने चंद्रपूर येथील देशी दारू दुकान स्थानंतरण करून ते सुरु करण्यासाठी जळका गटग्रामपंचायत मध्ये अर्ज प्राप्त झाला आहे, दरम्यान गट ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सचिव यांच्या संगनमताने देशी दारू दुकानाला मंजुरी देणाचा कट रचल्या गेला आहे, यासाठी ग्रामपंचायत द्वारे दिनांक 6 जानेवारी 2026 ला विशेष सभा बोलावली आहे, या विशेष सभेत देशी दारू दुकानाला मंजुरी निळावी याकरिता ग्रामस्थांना पैसे वाटप करण्यात येतं असून पैशाच्या जोरावर हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे,
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मौजा वडगाव येथे होणाऱ्या देशी दारू दुकानातून त्या वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या देशी दारू पुरवठा करण्याचा प्रयत्न होणार आहे असे दिसते, परंतु या देशी दारू दुकानाला या परिसरातील जळका, वडगाव पवणी यांसह माढेळी, केळी वाघनक या गावातील नागरिकांचा सुद्धा विरोध आहे, त्यामुळे या परिसरात देशी दारू दुकान झाल्यास शांतता व सुव्यवस्था भंग होऊन सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे या देशी दारू दुकान स्थानंतरण करण्याची मंजुरी देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या परिसरातील नागरिकांना घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे, दरम्यान आपल्या बाजूने ठराव व्हावा याकरिता जे देशी दारू दुकानदारांना मदत करत आहे त्या सर्वांविरोधात पुराव्यासह पोलीस तक्रार देण्यार असल्याची माहिती आहे, यासाठी पोलीस प्रशासन विशेष लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे पैसे वाटणारे आणि पैसे घेणारे यांचे धाबे दाणाणले आहे.




