Home चंद्रपूर मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांचा माजी आदिवासी महामंत्री शुभम गेडाम यांच्या हस्ते...

मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांचा माजी आदिवासी महामंत्री शुभम गेडाम यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात शाल-फुल व आदिवासी समाजातील मानाचा दुप्पटा देऊन सत्कार केला….

 

 

आदिवासी समाजाच्या सेवेला मानाचा मुजरा

मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांचा माजी आदिवासी महामंत्री शुभम गेडाम यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात शाल-फुल व आदिवासी समाजातील मानाचा दुप्पटा देऊन सत्कार केला….

चंद्रपूर :-  आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत माजी आदिवासी महामंत्री तसेच दुर्गापूर ग्रामीण परिसरातील आदिवासी बांधवांनी चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून यांचा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात आत्मीय सत्कार केला. यावेळी मा. आमदारांना शाल, पुष्पहार व आदिवासी समाजातील मानाचा दुप्पटा देऊन सन्मानित करण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादात पार पडलेला हा सत्कार कार्यक्रम अत्यंत भावनिक व उत्साहवर्धक ठरला.

News reporter :- अतुल दिघाडे

आदिवासी समाजाला न्याय, सन्मान आणि समान संधी मिळावी, तसेच समाजातील युवक-युवतींना रोजगार व स्वावलंबनाचा मार्ग खुला व्हावा, या ध्येयाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांची यावेळी उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली. जिल्ह्यातील आदिवासी वस्तीगृहांच्या बांधकाम व दुरुस्ती कामांसाठी आदिवासी समाजातीलच कंत्राटदारांची नियुक्ती व्हावी, यासाठी विधानसभेत ठाम व निर्भीडपणे आवाज उठवण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

पालकमंत्री असताना राबविण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य’ या अभिनव उपक्रमातून आदिवासी युवक-युवतींनी एव्हरेस्ट सर करून इतिहास घडवला, ज्यामुळे संपूर्ण जिल्हा व राज्याचा अभिमान वाढला. ही कामगिरी केवळ एक यशस्वी मोहिम नसून, आदिवासी समाजाच्या क्षमतेचे व आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.

तसेच घरकुल योजनेअंतर्गत १५,०५८ घरे मंजूर होऊन हजारो कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार झाले. समाजाच्या मूलभूत गरजा, विकास व कल्याणासाठी ₹९६ कोटी ३६ लाख ४२ हजार ४०० इतका भरीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी हिवाळी अधिवेशनात ठोस व प्रभावी मागणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या सर्व कार्याची दखल घेत आदिवासी समाजाने व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी हीच पुढील कार्याची खरी प्रेरणा असल्याचे मा. आमदारांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, सन्मानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सेवा अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.