
पुन्हा नव्याने सुरुवात विकासासाठी… ध्येय, जिद्द आणि विश्वासाचा वारसा
वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये नागरिकांच्या हृदयातील ‘फिक्स नगरसेविका’ – माजी नगराध्यक्ष सौ. सुनीता वीरेंद्र लोढिया
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथम महिला नगराध्यक्ष म्हणून मानाचा ठसा उमटविणाऱ्या या केवळ एक व्यक्ती नाहीत, तर त्या वडगाव प्रभाग क्र. ८ च्या विकासाची चालती-बोलती ओळख आहेत. तब्बल तीन वेळा नगरसेविका म्हणून जनतेने ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्या सौ. सुनीता लोढिया यांनी आपल्या कार्यकाळात विकास, संवेदनशीलता आणि सातत्य यांचा अद्वितीय संगम घडवून आणला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
वडगाव प्रभागातील नागरिकांशी हृदयाशी जोडलेले नाते, हीच त्यांची खरी ओळख. नाले असोत की रस्ते, डांबरीकरण असो वा खडीकरण, घराघरांत पोहोचलेले नळजोड व अमृत जलयोजना, विद्युत पोलपासून मीटरपर्यंतची सुविधा, झोपडपट्टीतील घरांना प्रकाश देणारे लाईट-मीटर, दत्तनगर परिसरातील घरपट्टीची सोय—या सर्व कामांची यादी मोजणेही अवघड ठरेल, इतकी व्यापक विकासगाथा त्यांच्या नावावर आहे.
“काम दिसले तरच मत मिळते” या लोकशाहीच्या तत्त्वाला त्यांनी कृतीत उतरवले. कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांच्या प्रश्नांना हात घालणारी नेतृत्वशैली, हीच त्यांच्या लोकप्रियतेची गुरुकिल्ली ठरली आहे. त्यामुळेच वडगाव प्रभाग क्र. ८ मध्ये आजही नागरिकांच्या मनातच नव्हे, तर हृदयातही त्यांचे स्थान अढळ आहे.
यंदाही पुन्हा एकदा विकासासाठी नवी सुरुवात, अधिक जिद्द आणि स्पष्ट ध्येय घेऊन त्या सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. “फिक्स नगरसेविका” ही ओळख केवळ राजकीय संज्ञा न राहता, ती नागरिकांच्या विश्वासाची पावती ठरली आहे. वडगाव प्रभागातील जनतेच्या पसंतीचा कौल स्पष्ट असून, सौ. सुनीता लोढिया यांच्याच नावावर विकासाची पुढील वाटचाल अवलंबून असल्याचे जाणवते.
वडगाव प्रभाग क्र. ८ साठी अनुभव, कार्यक्षमता आणि लोकविश्वास यांचा विश्वासार्ह चेहरा म्हणजेच सौ. सुनीता वीरेंद्र लोढिया—अशी भावना आज सर्वत्र उमटताना दिसत आहे.





