Home चंद्रपूर प्रबोधन व भव्य खंजेरी भजन संमेलन : सौ. सुनीता लोढीया, सौ. संगीता...

प्रबोधन व भव्य खंजेरी भजन संमेलन : सौ. सुनीता लोढीया, सौ. संगीता वाढई, श्री अजय बलकी, राहुल वाढई यांची प्रमुख उपस्थिती

प्रबोधन व भव्य खंजेरी भजन संमेलन : सौ. सुनीता लोढीया, सौ. संगीता वाढई, श्री अजय बलकी, राहुल वाढई यांची प्रमुख उपस्थिती

मानवता, ग्रामस्वच्छता व सामुदायिक एकोप्याचा जागर; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न

चंद्रपूर (वडगाव वार्ड – जुनी वस्ती) :-  अखिल भारतीय , यांच्या मार्गदर्शनाखाली आणि , वडगाव वार्ड (जुनी वस्ती), चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी जय हनुमान देवस्थान, वडगाव येथे “प्रबोधन व भव्य खंजेरी भजन संमेलन” मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा मानवतेचे महान पुजारी यांच्या 57 व्या पुण्यस्मरणानिमित्त (सर्वसंत स्मृती दिवस – मानवता दिन) आयोजित करण्यात आला.

News reporter :- अतुल दिघाडे

या दोन दिवसीय कार्यक्रमातून मानवता, ग्रामस्वच्छता, सामुदायिक ध्यान, सामाजिक प्रबोधन, एकोप्याची भावना आणि ग्रामविकास या मूल्यांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्वच्छतेपासून झाली. त्यानंतर सामुदायिक ध्यान, रामधून, प्रबोधनात्मक मार्गदर्शन, खंजेरी भजन संमेलन, मौन श्रद्धांजली व सामुदायिक प्रार्थना अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधनकार आदरणीय (ग्रामगीताचार्य, मध्यवर्ती प्रतिनिधी – श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी) विराजमान होते. प्रमुख अतिथी म्हणून (मध्यवर्ती प्रतिनिधी), (मध्यवर्ती प्रतिनिधी) तसेच ग्रामसेवाधिकारी उपस्थित होते.
यासोबतच सौ. सुनीता लोढीया, सौ. संगीता वाढई, श्री अजय बलकी, राहुल वाढई यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

विचारमंथन व मार्गदर्शन

श्री नत्थूजी गोहणे यांनी युगसंजीवनी ग्रामगीता ग्रंथातील अध्यायाचे वाचन करून ग्रामविकास, स्वावलंबन व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व विशद केले.
ह.भ.प. श्री आण्याजी ढवस महाराज यांनी आपल्या अमृतमय वाणीतून सामुदायिक ध्यान, मानवता दिनाचे महत्त्व, संतविचारांचे आचरण यावर सखोल प्रबोधन केले.
ग्रामसेवाधिकारी श्री निळकंठ पायघन यांनी रामधून व सामूहिक प्रार्थनेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.
उपग्रामसेवाधिकारी यांनी सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन मांडले.

संचालन व समारोप

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन यांनी केले.
प्रास्ताविक यांनी मांडले.
कोषाध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरांचे व भाविकांचे आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

उत्स्फूर्त प्रतिसाद

या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावांमधून गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक-उपासिका, तसेच वडगाव परिसरातील सर्व बंधू-भगिनी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व उपासक-उपासिका, ग्रामनाथ व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.

सप्रेम जयगुरू