आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाला यशस्वी करणारे हे आहेत रिअल हिरो?
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत झालेला कोट्यावधीचा घोटाळा व त्याविरोधात आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या नेतृत्वात सर्व सामाजिक राजकीय संघटनांना एकत्र करून सुरु केलेले आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते, दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या शिष्ठामंडळाची बैठक मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात दिनांक 27 जानेवारीला झाल्यानंतर त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्या संदर्भात जोपर्यन्त आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्री संवाद साधनार नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतल्या जाणारं नाही अशी आंदोलनकर्त्यांची अट होती, दरम्यान आमरण उपोषण 14 दिवसापासून करणाऱ्या मनोज पोतराजे यांच्यासोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत आपण उपोषण मागे घ्या आपण सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत जो भ्रष्टाचार झाला व परीक्षेत जो घोळ झाला त्याची संपूर्ण चौकशी करू असे ठोस आश्वासन दिले आणि लगेच चौकशीचे आदेश दिले त्यामुळे आमरण उपोषण मागे घेण्यात आले, दरम्यान आता जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे विभागीय सहनिबंधक यांनी 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने बँकेच्या भ्रष्ट संचालकांचे धाबे दाणाणले आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आणि मागासवर्गीय एससी, एसटी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण हटविण्याच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे यश मिळाले आहे. आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे मनोज पोतराजे यांनी 14 दिवस, तर रमेश काळबांदे यांनी 9 दिवस आमरण उपोषण केले व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या सगळ्या सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी बैंकेच्या नोकर भरतीत जो लढा उभारला त्याला मोठे यश आले आहे.
सुरुवातीला मनसे कडून उचलल्या गेला सिडीसीसी चा मुद्दा.
Cdcc बैंकेची नोकर भरतीची जाहिरात जेंव्हा निघाली तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मनसे तर्फे स्थानिक प्रशासन व सहकार विभागाकडे निवेदने देऊन पत्रकार परिषद घेतली व मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नाकारणाऱ्या सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष व संचालकांवर कार्यवाही करून ही नोकर भरती रद्द करा अशी मागणी केली, त्यावेळी त्यांच्यासोबत मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुढे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल, पियुष धुपे व इतर मनसे कार्यकर्ते सोबत होते, दरम्यान निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करून बेकायदेशीरपणे नोकर भरती प्रक्रिया राबविणाऱ्या सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष व संचालकवार कार्यवाही करा व नोकर भरती पुढे ढकला अशी मागणी घेऊन मनसेतर्फे बैंकेसमोर विधानसभा निवडणूक काळात निदर्शने आंदोलन करण्यात आले होते, त्यामुळे यां नोकर भरती प्रक्रियेवर जिल्हाधिकारी यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती,
विधनासभा निवडणूकीनंतर परत cdcc च्या नोकर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र बैंकेच्या नोकर भरतीत केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेचं मुद्दा उचलला असल्यामुळे काही मागासवर्गीय समाज संघटनाचे पदाधिकारी जुळल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सर्व समाज संघटनाना एकत्र आणण्यासाठी स्थानिक विश्रामगृहात एक बैठक घेऊन आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनाना घेऊन आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती स्थापन केली व त्या माध्यमातून दिनांक 2 जानेवारी पासून सिडीसीसी बैंके च्या मुख्यालयासमोर साखळी ठिय्या आंदोलन सुरु केले, त्यानंतर दिनांक 16 जानेवारी पासून मनोज पोतराजे हे आमरण उपोषणास बसले तर 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे यांनी आमरण उपोषण सुरु केले, यां दरम्यान माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळॆ यांनी भेटी दिल्या, राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासोबत आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे शिष्ठमंडळ भेटले व त्यांना सुद्धा आरक्षणाचा विषय लक्षात आणून देण्यात आला, शेवटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या शिष्ठमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन मुद्दा मांडला आणि तेंव्हा कुठे चौकशीचे आदेश निघाले,
हे आहेत सिडीसीसी विरोधाहेतील आंदोलनाचे रिअल हिरो
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक म्हणून संपूर्ण जबाबदारी घेणारे व सर्व समाज संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणणारे राजू कुकडे यांची सुरुवाती पासूनचं मोठी कामगिरी राहिली आहे, कारण शासन प्रशासनाकडे पत्रव्यवहार आणि बैठका, शिवाय मंडपाचे संपूर्ण नियोजन त्यांनी सांभाळले तर सूर्या अडबाले, संजय कन्नावार, अनुप यादव, नभा वाघमारे, मनोज पोतराजे, रमेश काळबाँधे यांचे सुद्धा विशेष योगदान होते, दरम्यान कुणबी एकता मंचचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे, जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे अध्यक्ष राजेश बेले, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष बंडु हजारे, स्वराज्य शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष सुर्या अडबाले, पीपीआयडीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र खंडाळे, शहर अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, महिला जिल्हाध्यक्ष नभा वाघमारे, धनगर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय कन्नावार, गोंडी धर्मिय समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश मेश्राम, अनुसूचित जातीं संघटनेचे प्रचारक आनंद इंगळे, झाडे सुतार समाज संघटनेचे मंगेश बुरडकर, महाराष्ट्र नाभिक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर, अहिर समाज संघाचे जिल्हाध्यक्ष अनुप यादव, पांचाळ सुतार समाज संघटनेचे अध्यक्ष मनोज तांबेकर, महेश वासलवार, राजू बिट्टूलवार, शिल्पा कांबळे, अमन अंदेवार, आशिष माशीरकर, सुरेश पाईकराव, रोहित तुराणकर यांच्या सामाजिक संघटनाचे योगदान महत्वपूर्ण होते.





